Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणीत नागोबा मंदिराची यात्रा साजरी

Spread the love

 

मूर्ती स्थापनेसह विविध कार्यक्रम : दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : शहर परिसरात सोमवारी (ता.२१) नागपंचमी विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी झाली. पूजा, झोपाळे, खेळणे, नागपंचमीची गाणी, महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील नागोबा गल्लीतील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांनी स्थापन केलेल्या नागोबा मंदिरामध्ये नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी कुंभार गल्ली येथे बनवलेल्या नागोबाची मुर्तीची पूजा श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते करून कुंभाराला मानाचे नारळ व विडा देऊन श्रीनागोबाची मूर्ती कुंभार यांच्या घरापासून वाजत गाजत गावातील प्रमुख मार्गावरून नागोबा गल्ली येथे आणण्यात आली. त्यानंतर मंदिरामध्ये मूर्तीचे श्रीमंत दादाराजे निपाणीकर व श्रीमंत सम्राज्यलक्ष्मीराजे निपाणकर दाम्पत्याच्या हस्ते विधिपूर्वक प्राण प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली.
यावेळी परिसरातील शहर व परिसरातील भक्तांनी मनोभावे नागोबा देवाचे पूजा करून आशीर्वाद घेतला. नागोबा मित्र मंडळ्याच्या वतीने प्रसाद वाटप झाला. सायंकाळी या मूर्तीचे विधीपूर्वक अंमलझरी तळ्यामध्ये विसर्जन करण्यात आले. यावेळी श्रीमंत विजयराजे निपाणकर, श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे निपाणकर, मंडळाचे अध्यक्ष महेश खोत, उपाध्यक्ष मनोज शिंदे, दत्तात्रय खोत, प्रताप पाटील, अवधूत चव्हाण, प्रकाश परीट, मल्लू निकम, सुनिल मोरे, रमेश परिट, अमोल देवडकर, किरण शिंदे यांच्यासह नागराज युवक मंडळ, नागराज महिला मंडळाचे सदस्य, एम टी एम बॉईजचे कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते. मंगळवारी (ता.२२) दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
—————————————————————–
सोमवारी शहर आणि परिसरात घरोघरी मातीच्या नागाची पूजा करण्यात आली. तर काही महिलांनी ग्रामीण भाग आणि शहराबाहेर असलेल्या उपनगरात जाऊन वारुळाच्या ठिकाणी पूजा केली. अनेक युवती आणि महिलांचा नागपंचमीच्या झोका उंच जातानाचे चित्र निपाणी शहर उपनगरात दिसून आले.
ग्रामीण भागात दिवसभर झिम्मा फुगडीलाही उधाण आले होते.
नागपंचमी दिवशी महिला घराची स्वच्छता करून अंगणात रांगोळी रेखाटल्या होत्या. देव्हाऱ्यावर नागाची पूजा करण्यासह नागाचे चित्र भिंतीवर काढून त्याची पूजा केली. काही ठिकाणी नागाच्या वारूळाजवळ महिला गाणी म्हणत जाऊन वारूळाची पूजा केली.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *