Sunday , June 7 2026
Breaking News

वाळकी यात्रेत दानोळीच्या बंडा शिंदे यांची बैलगाडी प्रथम

Spread the love

 

बंडा खिलारे ठरले द्वितीय मानकरी; भर उन्हात शर्यती शौकिनांची गर्दी

निपाणी (वार्ता) : वाळकी येथील श्री मरगुबाई देवाची यात्रा मंगळवार (ता.२१) आणि बुधवारी (ता.२२) पार पडली. त्यानिमित्त प्रथमच शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये दानोळीच्या बंडा शिंदे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक मिळवून प्रथम क्रमांकाचे ३५ हजार ५५५ रुपयांचे रोख बक्षीस व ढाल पटकावले.

या शर्यतीत दानोळीच्या बंडा खिलारे आणि चिक्कोडीच्या स्वराज्य सावंत यांच्या गाड्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची २५ हजार ५५५, १५ हजार ५५५ रुपये रुपयांचे रोख बक्षिसे व ढाल पटकावली.
जनरल घोडा -बैलगाडी शर्यतीमध्येतुषार पाटील -म्हैशाळ,सुरेश टिकारे- अब्दुल लाट आणि दिलीप चव्हाण-हातकणंगले, यांच्या गाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांकाची १५ हजार, १० हजार, ७ हजार रुपयांची बक्षिसे मिळवली. घोडा -गाडी शर्यतीमध्ये नाना लमाण्णा -चिखली, घरांण्णा -आलास, दत्ता धारवाड यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची १० हजार, ७ हजार, ५ हजार रुपयांची बक्षीसे मिळवली. घोडेस्वार शर्यतीत गोल्डन गुट्टी मरगुबाई प्रसन्न -वाळकी यांनी, पाड्याची धुरी हातात धरून पळविण्याच्या शर्यतीत पिंटू नाईक -वाळकी परसू वळकुंडे-वाळकी, किरण कागे -पट्टणकुडी यांनी अनुक्रमे १५,००, १,०००, ५,०० रुपये आणि सायकल शर्यतीमध्ये मारुती मडिवाळ -घटप्रभा, बाळू हिरेमठ -इचलकरंजी आणि बसवराज व्हरांबळे-चिक्कोडी यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची २ हजार, १५,०० व १ हजार रुपयांची बक्षिसे पटकाविली.

About Belgaum Varta

Check Also

अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण निमित्त बीज संकलन उपक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील कोडणी रोडवरील अंकुर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *