Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीतील शेट्टी सराफ बंधूंनी बनविला बदामी बनशंकरी देवस्थानसाठी १५० किलोचा चांदीचा रथ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अप्पय्या शिवरुद्रप्पा शेट्टी सराफ दुकानातून बदामी येथील बनशंकरी देवस्थानासाठी तब्बल १५० वजनाचा रथ बनवण्यात आला होता. शनिवारी (ता.१३) सकाळी देवस्थान कमिटी पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी समाधी मठातील प्राणलिंग स्वामींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी प्राणलिंग स्वामी आणि महिलांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती करून देवस्थान कमिटीकडे रथ पाठविण्यात आला.
सुरेश शेट्टी म्हणाले, यापूर्वी बेल्लद बागेवाडी मधील जडी सिद्धेश्वर देवस्थानासाठी ४५ किलो तर सिद्धेश्वर देवस्थानासाठी साठी ४५ किलो वजनाच्या २ पालख्या बनवल्या होत्या. निपाणी महादेव मंदिर चांदीची पालखी, तोरणहळ्ळी हनुमान मंदिरात चांदीची पालखी, मुधोळ, येडूर, कोळीगुड येथे चांदीच्या पालख्या दिल्या आहेत.
१५० किलो चांदीचा रथ बनवण्यासाठी कमिटीतर्फे संधी देण्यात आली होती. रथ तयार करण्यासाठी ६ महिन्याचा कालावधी लागला. त्यासाठी दररोज २५ कामगार कार्यरत होते. या रथावर, सिंहाच्या मूर्तीसज्ह विविध देवदेवतांची आकर्षक कलाकुसर केली आहे. याशिवाय रथामध्ये दहा किलोची चांदीची मूर्ती तयार केल्याचे सांगितले. रवींद्र शेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले
यावेळी अमर बागेवाडी, महालिंगेश कोठीवाले, डॉ. सी.बी. कुरबेट्टी, शिवानंद पुराणिकमठ, आदित्य शेट्टी, कार्तिक शेट्टी, महेश बागेवाडी, अशोक दुमाले, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष गीता पाटील, ललिता शेट्टी, सविता शेट्टी, विजया शेट्टी, रश्मी शेट्टी, राजेंद्र वाळवे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *