Sunday , July 26 2026
Breaking News

ममदापूर अंबिका देवीची यात्रा उत्साहात

Spread the love

मॅरेथॉन हलगी स्पर्धा : मान्यवरांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : ममदापूर (केएल) येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवीची यात्रा मंगळवार (ता.३) ते शुक्रवार (ता.६) अखेर उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह मॅरेथॉन आणि हलगी स्पर्धेचे आयोजन करण्यात होते.
यात्रेनिमित्त मंगळवारी (ता.३) सकाळी आठ वाजता पालखी मिरवणूक व गाव पाळक ठेवण्यात आला, बुधवारी (ता.४) सकाळी सात वाजता मॅरेथॉन स्पर्धा, गुरुवारी (ता.५) सकाळी ११ वाजता देविस अभिषेक व दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आली. यावेळी खासदार आण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले, बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील बेडकिहाळ येथील वेंकटेश्वरा पॉवरप्रोजेक्ट कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक, सुरेश व्हणाईकर, बसवराज जिरगाळ यांच्यासह मान्यवर होते. गुरुवारी (ता. ५) हलगी स्पर्धा, रात्री ९ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा पार पडल्या. शुक्रवारी(ता.६) सकाळी सात वाजता गुरव यांच्या हस्ते देवीस महाअभिषेक व दुपारी १२ वाजता गोंधळाचा कार्यक्रम पार पडला.
यात्रेनिमित्त ममदापूर येथील निरंजन पाटील सरकार यांचे सासरे सीआयडी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज घोरपडे सरकार, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग सेलचे सरचिटणीस धैर्यशील सुपले यांचा युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी निरंजन पाटील-सरकार, महारुद्र स्वामी, गजानन कावडकर, रावसाहेब गोरवाडे, सतीश पाटील, प्रकाश गायकवाड, अमित शिंदे, मोहन पाटील, प्रकाश पाटील, विकास चौगुले, अमित हरेल, संदीप तोडकर, शेखर पाटील, संभाजी पाटील, पांडुरंग हरेल, दत्ताजी देवर्डे, संभाजी नेजे, महादेव मधाळे, यांच्यासह उत्तम पाटील प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *