Saturday , December 7 2024
Breaking News

गौरव्वाची हत्या नगरसेवक उमेश कांबळे याच्याकडून

Spread the love
पैशाच्या देण्या-घेण्याच्या व्यवहारातून मर्डर..
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस येथील विधवा महिला शैलजा ऊर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार (वय 55) हिची रविवार दि. 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी 5.45 वाजता कंट्रीमेड पिस्तूलने गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली मारेकरी भाजपाचा नगरसेवक उमेश रमेश कांबळे यांनी पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे गेले पाच दिवस चाललेल्या गौरव्वा मर्डर प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात संकेश्वर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, बेळगांव जिल्हा सहाय्यक पोलीस प्रमुख महानिंग नंदगांवी, गोकाक डीएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरी मंडळ पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, संकेश्वर पोलिस कर्मचारी बी. के. नांगनुरे, एस. एम. चिक्कण्णावर, बी. एस. कपरट्टी, एम. एम. जंबगी, एम. एम. करगुप्पी, एस. ए. शेख, एम. जी. दादामलिक यांनी गौरव्वा मर्डरचा तपास 72 तासांत लावून दाखविला आहे.
पोलिस सूत्रांकडून गौरव्वा मर्डर मिळालेली माहिती अशी संकेश्वर प्रभाग क्रमांक 14 मधील भाजपाचा नगरसेवक उमेश रमेश कांबळे (वय 35) राहणार गोरक्षणमाळ संकेश्वर यांनी रविवार दि. 16 रोजी सकाळी 5.45 वाजता गौरव्वाच्या घरी जाऊन कंट्रीमेड पिस्तुलने गौरव्वाच्या पाठीत धडाधड तीन गोळ्या झाडून हत्या केली आहे. उमेशला गौरव्वाने कर्जाने पैसे दिले होते. मूळ रक्कमेपेक्षा गौरव्वाने व्याजाची रक्कम तिप्पट केल्यामुळे दोघांमध्ये कांहीं दिवसांपासून शाब्दिक चकमक चालली होती. गौरव्वाच्या अर्वाच्च शिवीगाळने संतप्त उमेश कांबळे यांनी गौरव्वाची गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली पोलीसांसमोर दिली आहे. गौरव्वाची हत्या करण्यास उमेश कांबळे याला महाराष्ट्र राज्यातील सांगलीचे राहुल राजू रजपूत (वय 28) अखिलेश ऊर्फ लिंबे महेश दरुरमठ (वय 27) यांनी मदत केल्याचे दिसून येताच संकेश्वर पोलिसांनी शिताफीने दोघांना गजाआड केले आहे. गौरव्वा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी उमेश कांबळे याच्याकडून पोलिसांनी गौरव्वा हत्येसाठी वापरलेली कंट्रीमेड पिस्तूल, ब्रिज कार, दोन मोबाईल हँन्डसेट जप्त केले आहे. उमेशने हत्येसाठी कंट्रीमेड पिस्तूल सांगलीतून मिळविल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. संकेश्वर पोलिसांनी आज तिघा आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संकेश्वर पोलीस ठाण्यात गौरव्वा मर्डर प्रकरणाची नोंद करण्यात आली असून आरोपींवर कलम 302,451 आयपीसी, आणि कलम 25 (आयबी) एक भारतीय शस्त्र कायदा 1959 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेश्वर पोलिसांचे अभिनंदन
बेळगांव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी हुक्केरी मंडळ पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ, संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचारींनी केवळ 72 तासांत गौरव्वा हत्याकांडचा तपास लावण्याचे कार्य करुन दाखविले बदल विशेष अभिनंदन केले आहे.
उमेशला खंत नाही
गौरव्वाचा मारेकरी उमेश कांबळे याला आज पोलिसांनी पंचनाम्यासाठी गौरव्वाच्या घरी बोलावून आणले असता तो ओळखीच्या लोकांना बघून बिनधास्त हातवारे करताना दिसला. जवळच्या मित्रांना बघून त्यांने दोन बोटांनी विजयी झाल्याचे हातवारे केले. त्यामुळे उमेश याला गौरव्वा मर्डरचा पश्चात्ताप झालेला नसून उलट सदर घटनेने त्याला मानसिक शांती समाधान मिळाल्याचे दिसून येत होते. पोलीस कोठडीत देखील उमेशने पत्रकारांना अगदी हसतमुखाने चहा घेणार काय असे विचारले आहे. गौरव्वाच्या रोजच्या त्रासातून सुटका झाल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर प्रकर्षाने दिसून येते होता.

About Belgaum Varta

Check Also

घटप्रभा नदीत बुडून दोन मुलासह वडिलांचा मृत्यू

Spread the love  हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *