Friday , June 13 2025
Breaking News

श्रीक्षेत्र वल्लभगड येथून पायी दिंडीचे प्रस्थान

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : श्रीक्षेत्र वल्लभगड येथून आज विठूरायाच्या नाम गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात भक्तीमय वातावरणात श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडीचे प्रस्थान झाले. वल्लभगड श्रीराम मंदिर येथे दिंडी चालक हभप हैबती वाघमोडे यांनी विणापूजन करुन दिंडी सोहळ्याला चालना दिली. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली वल्लभगड पायी दिंडी सोहळा होऊ शकलेला नव्हता. यंदा मात्र पांडुरंगाच्या कृपेने श्रीराम मंदिर सांप्रदाय भजनी मंडळाच्या श्रीक्षेत्र वल्लभगड ते श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याला सुयोग लाभल्याने वारीकरीमध्ये मोठा आनंद पहावयास मिळाला. वल्लभगड पायी दिंडीचे हे ९ वे वर्ष असून यंदाच्या दिंडी सोहळ्यात वल्लभगड, ममदापूर (केएल), सोलापूर येथील ६० वारकरी सहभागी झाले आहेत. श्रीक्षेत्र वल्लभगड ते श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडी सोहळा २९ जून २०२२ ते ११ जुलै २०२२ अखेर चालणार आहे. दिंडी सोहळ्यात काकडआरती, भजन, हरिपाठ, पंचपदी आरती असे कार्यक्रम चालणार आहेत. दिंडीचे नेतृत्व दिंडी चालक हभप हैबती वाघमोडे, हभप रामचंद्र शेलार करीत असून दिंडीत काशीनाथ शेलार, चंद्रकांत शेलार, राजू शेलार, बंडा शेलार, रावसाहेब वाघमोडे, भाऊसाहेब जरग, रामा मगदूम, मल्हारी वाघमोडे, सदाशिव गायकवाड, नामदेव शेलार आणि वारीकरी सहभागी झाले आहेत. वल्लभगड पायी दिंडी सोहळ्याला हरगापूर ग्रामपंचायत अध्यक्ष रविंद्र शेलार, काशीनाथ शेलार, उत्तम बोरे, पांडुरंग माने, धोंडिबा शेलार आणि ग्रामस्थांनी भक्तीपूर्वक शुभेच्छा प्रदान केल्या. वल्लभगड श्रीराम मंदिर येथून माने गल्ली, शिवाजी चौक, वाडी विभागातून पायी दिंडीचे भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरात तुळजाभवानी मूर्तीची उद्या प्रतिष्ठापना!

Spread the love  संकेश्वर : गोंधळी समाजातर्फे सुभाष रोड कमतनुर वेस नजीक लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *