Monday , September 21 2026
Breaking News

२९ जानेवारीला परिवहन कर्मचाऱ्यांचे ‘बंगळुर चलो’ आंदोलन

Spread the love

 

बंगळूर : पगार आणि वेतन सुधारणांशी संबंधित दीर्घकाळापासून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत केएसआरटीसीसह राज्यातील चार राज्य परिवहन महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनी २९ जानेवारी रोजी ‘बंगळुर चलो’ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. सरकारशी वारंवार झालेल्या चर्चांमधून कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळांच्या कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने हा निर्णय जाहीर केला.
संघटनांच्या माहितीनुसार, परिवहन कर्मचाऱ्यांना गेल्या ३८ महिन्यांपासून थकबाकी मिळालेली नाही. तसेच १ जानेवारी २०२४ पासून लागू होणारी वेतन सुधारणा अद्याप अंमलात आलेली नाही. या सततच्या विलंबामुळे राज्यभर दैनंदिन सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असून, सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात, अशी संघटनांची मागणी आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *