
विजयपूर : जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी क्रॉसजवळ सरकारी बस आणि टिपर (कँटर) यांच्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टिपरचा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते समोरून येणाऱ्या सरकारी बसवर जाऊन आदळले. या भीषण अपघातात टिपर चालक अशोक उटगी, त्यांची पत्नी राधाबाई उटगी आणि सरकारी बस चालक हनुमंत चवलादी यांचा मृत्यू झाला.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त वाहनांचे टिपर/कँटर नोंदणी क्रमांक: के ऐ -28- ऐऐ -6792 व सरकारी बस नोंदणी क्रमांक: केऐ-28- एफ-2468 यांच्यात झाला असून अपघाताच्या वेळी टिपर चडचणकडे जात होता, तर सरकारी बस चडचणहून विजयपूरकडे येत होती. त्यावेळी हा दुर्दैवी अपघात घडला आहे घटनास्थळी चडचणचे सीपीआय परशुराम मनगूळी, पीएसआय सोमेश गेज्जी तसेच पोलीस कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली. हा अपघात चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पुढील तपास सुरू आहे.
रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू
विजयपूर – जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील मरगूर साखर कारखान्यासमोर झालेल्या भीषण रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
टिप्पर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात, टिप्पर (TS 15 UD 3836) चालक रत्ननेश यादव हा चुकीच्या बाजूने (राँग साईडने) येत असताना वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकीला धडक दिल्याची माहिती मिळाली आहे. या धडकेत के 28 एच क्यू 4724 क्रमांकाच्या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
इंडी तालुक्यातील गोरनाळ गावचे धर्मण्णा होसमनी व भीरप्पा पुजारी हे रहिवासी असून त्यांचा जागीच मृत्यू झाला
अपघातात जखमी झालेल्या सोमय्या हिरेमठ यांना विजयपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना झळकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta