Sunday , September 20 2026
Breaking News

गणेशमूर्ती प्रतिष्ठानपणा मिरवणुकीत महिलांशी गैरवर्तन; हुबळीमध्ये तणाव

Spread the love

 

 

महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून गुन्हा दाखल; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध

हुबळी : गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान काही तरुणांनी महिलांशी कथितरित्या गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना हुबळी येथे घडली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हुबळीतील मराठा गल्ली ते सीबीटीकडे जाणाऱ्या मार्गावर मेदार गल्ली आणि कलाल गल्ली येथील गणेशमूर्तींच्या मिरवणुका समोरासमोर आल्या. यावेळी कलाल गल्लीच्या गणेशमूर्तीच्या मिरवणुकीतील डीजेसमोर काही तरुण महिलांशी गैरवर्तन करत असल्याचा आरोप आहे.

मिरवणुकीत सहभागी महिलांना लक्ष्य करून काही तरुणांनी अनुचित वर्तन केल्याचे सांगण्यात येते. हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक नागरिकांशी संबंधित तरुणांची बाचाबाची झाल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. महिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संबंधितांचा शोध सुरू केला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातील प्रमुख रस्ते आणि गणेशमूर्तींच्या मिरवणुकीच्या मार्गांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उत्सवाच्या आनंदात घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणपती भाड्याने! बेंगळूरमध्ये उत्सवाची नवी संकल्पना

Spread the love  भव्य मूर्तीची हौसही भागणार; पर्यावरणपूरक विसर्जनाचाही मार्ग मोकळा बेंगळूर : ‘गणपती बाप्पा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *