Sunday , November 22 2026
Breaking News

अन्नभाग्यच्या तांदळाचा काळाबाजार केल्यास कठोर कारवाई

Spread the love

 

 

अन्नमंत्री रिझवान अर्शद यांचा इशारा; बेकायदेशीर साठेबाजीविरोधात छापासत्र सुरूच

बेळगाव : गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी राबविण्यात येणाऱ्या अन्नभाग्य योजनेतील तांदळाची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा प्रकारांत सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे अन्नमंत्री रिझवान अर्शद यांनी दिला.

म्हैसूर येथील बंडीपाळ्या एपीएमसी बाजाराला सोमवारी सकाळी त्यांनी अचानक भेट देऊन विविध दुकानांची तपासणी केली. यावेळी वजनकाट्यांचीही पाहणी करण्यात आली. वजनात फेरफार करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे आढळून आल्याने काही संशयास्पद वजनकाटे जप्त करण्यात आले. शेतकऱ्यांची फसवणूक करणारे तसेच तांदळाचा बेकायदेशीर साठा करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे भात उत्पादनात घट झाली असून त्याचा परिणाम तांदळाच्या उपलब्ध साठ्यावर झाला आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काहीजण अन्नभाग्य योजनेतील तांदळाचा बेकायदेशीर साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यभर तांदळाच्या साठ्यांवर छापे टाकण्यात येत आहेत. तसेच बेकायदेशीररीत्या तांदळाची वाहतूक करणारे ट्रकही जप्त करण्यात आले आहेत. गरीबांसाठीच्या योजनेतील धान्याचा गैरवापर करून काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मंत्री रिझवान अर्शद यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

कावेरी नदी पाणीवाटप प्रकरणात तामिळनाडूला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; अतिरिक्त पाणी सोडण्याची मागणी फेटाळली

Spread the love  बेळगाव : कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात सुरू असलेल्या वादात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *