बेंगळुरू : चौथी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण करून पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक कर्नाटकमधून घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा जागीत मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या उत्तरेकडील आदर्श प्राथमिक शाळेतील ही धक्कादायक घटा उघडकीस आली आहे. शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थ्याला आधी लोखंडीं रॉडने मारहाण केली आणि नंतर शाळेच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली ढकलून दिले. या घटनेत चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हगली गावातील आदर्श प्राथमिक शाळेत ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भरत असे या मुलाचे नाव असून भरत हा इयत्ता चौथीचा विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याच्या आईलाही शिक्षकाने मारहाण केल्याचा आरोप आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी माहिती दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं आहे की, नरगुंड तालुक्यातील हदली गावात ही घटना घडली आहे. शिक्षक मुथप्पा हदगली याने भरत या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लोखंडी रॉड मारहाण केली. त्यानंतर, त्याने मुलाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून फेकून दिले. या घटनेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी शिक्षक कंत्राटी कर्मचारी आहे.
शिक्षकाकडून मुलाच्या आईलाही मारहाण
गडक जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवप्रकाश देवराजू यांनी सांगितले की, या घटनेमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा कौटुंबिक वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे. विद्यार्थ्याच्या आईलाही शिक्षकाने मारहाण केली आहे. विद्यार्थ्याची आईदेखील शाळेत शिक्षिका आहे. मृत विद्यार्थ्याच्या आईला झालेल्या मारहाणीमुळे ती जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी शिक्षकाने मारहाण का केली यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आरोपी कंत्राटी शिक्षक सध्या फरार आहे.