Saturday , December 13 2025
Breaking News

Belgaum Varta

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळील अर्जुननगर (ता. कागल) येथील एका महाविद्यालयाच्या मागील बाजूस निर्जन्य स्थळी युवकाचा खुन करून त्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. नंतर खुना सदरचा मृतदेह येथील निकम ओढ्यामध्ये फेकून दिल्याची घटना शनिवारी (ता.६) पहाटे उघडकीस …

Read More »

मराठा मंडळ फार्मासी कॉलेजमध्ये “अवयवदान” विषयावर सेमिनारचे आयोजन

  बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे आज शनिवार दि. 6 डिसेंबर रोजी “अवयवदान” या महत्त्वपूर्ण विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी व वक्ते म्हणून डॉ. कृष्णाजी वैद्य, सहायक प्राध्यापक, रचना शरीर विभाग, एस. एन. व्ही. व्ही. एस. संचलित एस. व्ही. जी. आयुर्वेदिक …

Read More »

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक वर्षापासून नदीच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. याबाबत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी नदी पासून पाणी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी या कामाचा पूर्तता केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पिंटू कांबळे …

Read More »

कारला आग लागल्याने लोकायुक्त निरीक्षकांचा होरपळून मृत्यू

  धारवाड : आय-20 कार गाडीने दुभाजकाला धडक दिल्याने अचानक पेट घेतली. या अपघातात लोकायुक्त सीपीआय पंचाक्षरी सालीमठ यांचा कारमधून बाहेर पडता न आल्याने होरपळून मृत्यू झाला. नुकताच आयएएस अधिकारी महांतेश बेळगी यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखीन एका अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्घटना धारवाडमध्ये घडली आहे. अन्नगिरी …

Read More »

धर्मांतरासाठी छळ; गृहिणीचा संशयास्पद मृत्यू

  रामदुर्ग : अनैतिक संबांधाच्या पार्श्वभूमीतून धर्मांतरासाठी छळ केल्याच्या आरोपावरून एका गृहिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील गोणगनूर गावात घडली आहे. नागव्वा देमप्पा वंटमूरी (२८) ही महिला शुक्रवारी आपल्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आली. नागव्वा यांचे लग्न होऊन नऊ वर्षे झाली होती. लग्नाच्या एका वर्षानंतर …

Read More »

कॅपिटल वन एसएसएलसी व्याख्यानमाला लांबणीवर; ७ ऐवजी २८ डिसेंबर रोजी

  बेळगांव : कॅपिटल वन यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित एसएसएलसी व्याख्यानमाला येत्या रविवार, दि. 07 डिसेंबर 2025 रोजी नियोजित होती. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून आता व्याख्यानमाला रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. संस्थेकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार, सर्व शिक्षक व पालकांनी …

Read More »

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी तीन टप्प्यांच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अलीकडे केवळ पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने तिसऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मंडळाने अधिकृत निवेदन देत गोंधळ …

Read More »

इंडिगोची उड्डाणे विस्कळीत; बंगळुरात १०२ उड्डाणे रद्द; प्रवाशांचा चौथ्या दिवशीही उसळला संताप

  बंगळूर : ऑपरेशनल अडचणींमुळे इंडिगो एअरलाइन्सच्या सेवा चौथ्या दिवशीही विस्कळीत झाल्या असून, आज केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल १०२ उड्डाणे रद्द करण्यात आली. ५२ आगमन आणि ५० निर्गमन रद्द झाल्याने शेकडो प्रवासी विमानतळावर तासन्तास अडकून पडले. काहींना तर १२ तासांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागली. विमान उशिरा येणे आणि वेळोवेळी रद्द …

Read More »

गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे येथे महाप्रसादातून विषबाधा; २५० हून अधिक बाधित

  नेसरी : सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे शुक्रवारी दुपारी एका धार्मिक कार्यक्रमानंतर झालेल्या महाप्रसादातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत लहान मुले आणि महिलांसह तब्बल २५० हून अधिक नागरिक बाधित झाले असून, त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. या घटनेमुळे संपूर्ण सांबरे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सांबरे गावात …

Read More »

फ्रिजमधील शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; एचईआरएफच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

  बेळगाव : बेळगाव येथील सुळगा-उचगाव गावात एका घरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने मोठी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती. बेळगावच्या सुळगा-उचगाव गावातील देशपांडे गल्लीत आज सकाळी सुमारे १० वाजता शॉर्ट सर्किटमुळे एका घरात मोठी आग लागून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घरात गॅस सिलिंडर असल्याने स्फोटाची भीती होती, मात्र …

Read More »