Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

पंच गॅरंटी योजनेमळे कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला

  पंच गॅरंटी योजनेच्या शिबिराला मोठी उपस्थिती, विविध मान्यवरांची उपस्थिती. नंदगड : कर्नाटक सरकारने अडीच वर्षांपूर्वी निवडणुकीच्या वेळी पंच गॅरंटी योजना जनतेसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना, युवा निधी आदी पंच गॅरंटी योजना सुरू केल्या. आत्तापर्यंत साधारणता सर्वच …

Read More »

यादवाड येथील सिमेंट कारखान्यात दुर्घटना; बिहारमधील कामगाराचा मृत्यू

  मुडलगी : डालमिया सिमेंट कारखान्यात काम करत असताना तोल जाऊन पडल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना मुडलगी तालुक्यातील यादवाड गावात घडली आहे. सिमेंट कारखान्यात कामावर असताना तोल जाऊन खाली पडल्याने रमेश राम नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला. नंदकुमार आणि रमेश महेंद्र राम हे दोन …

Read More »

४८४ अग्निवीर जवानांचा शानदार दीक्षांत समारंभ संपन्न

  बेळगाव : प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४८४ अग्निवीर जवानांचा शानदार दीक्षांत समारंभ प्रमुख पाहुणे मेजर जनरल हरी भास्करन पिल्लाई यांच्या उपस्थितीत मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे पार पडला. राष्ट्रीय ध्वज आणि रेजिमेंटल ध्वज यांच्या साक्षीने अग्निवीर जवानांनी देशसेवेची शपथ घेतली. अग्निवीर जवानांनी एकतीस आठवड्याचे खडतर प्रशिक्षण मराठा लाईट इन्फंट्री …

Read More »

बागलकोटमध्ये भीषण अपघात; ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकून कारमधील चौघांचा जागीच मृत्यू

  बागलकोट : बागलकोट जिल्ह्यात सिद्धापूर गावाजवळ काल रात्री भरधाव वेगात आलेल्या एका कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमध्ये असलेल्या विश्वनाथ कंबार (१७), प्रवीण शेडबाळ (२२), गणेश अळ्ळीमट्टी (२०) आणि प्रज्वल शेडबाळ (१७) या चौघा दुर्देवी तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण …

Read More »

लोंढा अरण्य खात्यातर्फे रवळनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वनदर्शन

  खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथील विद्यार्थ्यांना लोंढा अरण्य विभाग व कर्नाटक सरकार यांच्या चिन्णर वनदर्शन अंतर्गत करंबळ ट्री पार्क, राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालय व हेमडगाव सदाहरित जंगलाला शैक्षणिक भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी जैवविविधता, लायकेन-शेवाळे, सदाहरित जंगलाची वैशिष्ट्ये व वन्य प्राण्यांच्या पाऊलखुणांचा प्रत्यक्ष अभ्यास …

Read More »

जे. एम. कालीमिर्ची मार्केट पोलीस निरीक्षक पदावर

  बेळगाव : पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांची पुन्हा एकदा मार्केट पोलीस स्थानकाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक असताना वादग्रस्त “सेल्फी प्रकरणात” अडकलेले कालीमिर्ची यांनी काही दिवसांपूर्वी सायबर पोलीस स्थानकाचा पदभार स्वीकारला होता. मात्र आता त्यांची सायबर पोलीस स्थानकाच्या लगत असलेल्या बेळगाव शहरातील मार्केट पोलीस …

Read More »

येडियुरप्पा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

  पोक्सो प्रकरणातील खटल्याला स्थगिती बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पोक्सो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. येडियुरप्पा आणि इतर चार आरोपींनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश स्थगित केला. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर …

Read More »

बेळगाव एपीएमसी नेमदी केंद्रात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

  बेळगाव : बेळगाव येथील एपीएमसी मार्केट परिसरात असलेले नेमदि सेवा केंद्रातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्यामुळे नागरिकांना ग्राहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर नेमदी सेवा केंद्र सकाळी एक -दोन तास खुले राहते त्यानंतर दुपारच्या जेवणाची सबब देत अधिकारी हे सेवा केंद्र बंद करून जातात ते पुन्हा अधिकारी सेवा …

Read More »

चक्क एटीएम मशीनच दरोडेखोरांनी पळवली; पण प्रयत्न अयशस्वी!

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी गावात राष्ट्रीय महामार्ग 48 वर दरोडेखोरांनी एटीएम मशीनच ढकलगाडीवर (हातगाडी) वरून घेऊन पळविल्याची घटना घडली. याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी, 3 दरोडेखोर प्रथम एटीएममध्ये घुसले आणि तेथील सेन्सरला आवाज येऊ नये म्हणून स्प्रे मारला. नंतर त्यांनी एटीएम मशीन ढकलगाडीवर ठेवून 200 मीटर गाडी चालवली. …

Read More »

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार!

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. पीठ गिरणीवर जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने ओढत उसाच्या शेतात नेऊन तिला मारहाण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला असल्याची माहिती उशिरा उघडकीस आली आहे. मुरगोड पोलीस स्थानकाच्या …

Read More »