बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुतनाळ येथील केदार पीठ शाखेचे श्री शिवानंद शिवाचार्य स्वामीजी यांचे बेळगाव मधील एका खाजगी रुग्णालयात आजारपणामुळे देहावसान झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे श्री शिवानंद शिवाचार्य स्वामीजी यांना बेळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि उपचाराचा फायदा न होता काल शनिवारी रात्री …
Read More »कोणत्याही परिस्थितीत महामेळावा यशस्वी करणार; शहर समितीच्या बैठकीत निर्धार!
बेळगाव : बेळगाववर आपला अधिकार सांगण्यासाठी कर्नाटक सरकार 2006 पासून बेळगाव येथे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन घेण्यात येते. यावर्षी देखील हिवाळी अधिवेशन बेळगाव घेण्यात येणार आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिकांकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असते परंतु …
Read More »मार्कंडेय नदीत होनगा ब्रीजखाली तरंगणारे प्राण्यांचे मृतदेह तात्काळ हटवण्याची मागणी
बेळगाव : मार्कंडेय नदीतील होनगा ब्रीजखाली चार मृत प्राण्यांचे मृत्यूदेह तरंगताना आढळल्याने परिसरात मोठी चिंता निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या मते हे मृतदेह अंदाजे २-३ दिवसांपासून नदीत असल्याचे दिसत असून त्यांचे विघटन सुरू झाल्याने दूषित तेलकट थर संपूर्ण नदीपात्रात पसरला आहे. नदीत निर्माण झालेला हा दुर्गंधीयुक्त थर आणि पाण्याचे वाढते …
Read More »निपाणीत चार दिवस ‘महाआरोग्य’ तपासणी शिबिर
अध्यक्ष प्रकाशभाई शहा यांची माहिती; अत्यंत माफत दरात केली सोय निपाणी (वार्ता) : येथील कोठीवाले कॉर्नर वरील मास्क ग्रुप संचलित डॉ. वैशाली व डॉ. विलास पारेख यांच्या महावीर आरोग्य सेवासंघातर्फे शुक्रवार (५ डिसेंबर) ते सोमवार (ता.८ डिसेंबर) अखेर महाआरोग्य शिबिर होणारआहे. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत अत्याधुनिक …
Read More »शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अधिवेशनात आंदोलन छेडणार
राजू पोवार; यरनाळमध्ये ‘रयत संघटनेतर्फे शेतकरी मेळावा निपाणी (वार्ता) : ऊसाच्या उप पदार्थापासून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी एक हजार रुपये दिले पाहिजेत. शेतकऱ्यांना वीज पंपासाठी दहा तास थ्री फेज वीज पुरवठा करावा. शेतकऱ्यांचे कर्ज आणि व्याज माफ करून ५८ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना दर महिना पाच …
Read More »बेळगाव महापालिकेतील आरोग्य अधिकारी पद संपुष्टात; डॉ. नांदरे यांची बंगळुरूला बदली
बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव महानगरपालिका आरोग्य अधिकारी पद रद्द करण्याचा निर्णय घेतला असून या आदेशानुसार कार्यरत हेल्थ ऑफिसर डॉ. संजीव नांदरे यांना त्यांच्या पदावरून तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. यानंतर त्यांची बदली बंगळुरू आरोग्य विभागात करण्यात आली आहे. डॉ. नांदरे यांनी महापालिका स्तरावर जन्म–मृत्यू नोंदणी, प्रमाणपत्रांचे वितरण, ट्रेड …
Read More »मराठा मंडळ फार्मासी कॉलेजच्या बी. फार्मासी दुसऱ्या आणि सहाव्या सत्रातील परिक्षांचे निकाल जाहीर
बेळगाव : येथील मराठा मंडळ संस्थेच्या फार्मासी कॉलेजमध्ये बी. फार्मासी या अभ्यासक्रमात दुसऱ्या आणि सहाव्या सेमिस्टरमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून दुसऱ्या सेमिस्टरमध्ये कु. श्रुती वि. हिरोजी हिने ८३.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. चंदना भू. सावंत हिने ८३.०९% द्वितीय क्रमांक तर कु. धनश्री कदम हिने ८२.९०% …
Read More »सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तिघांना अटक; टिळकवाडी पोलिसांची कारवाई
बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या तीन युवकांना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली. गुरुवारी रात्री गस्ती दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक परशुराम एस. पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेगवेगळ्या भागांत ही धडक कारवाई केली. पहिल्या कारवाईत केएलएस हायस्कूल परिसरात अंमली पदार्थाच्या नशेत गैरवर्तन करणाऱ्या अभिषेकला ताब्यात …
Read More »निवृत्त सैनिक मारहाण प्रकरणी माजी सैनिक संघटनेकडून नंदगड पोलीस स्थानकास घेराव
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड येथील निवृत्त सैनिकावर पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ वायरल होताच तालुक्यात एका संतापाची लाट उसळली. हेल्मेट नसल्याचे क्षुल्लक कारणावरून एका निवृत्त सैनिकाला चार ते पाच पोलिसांनी मारहाण करत जबरदस्तीने ओढत पोलीस ठाण्यात नेल्याची घटना नंदगड येथे नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांसोबतच निवृत्त …
Read More »अग्निवीर अनिरुद्ध पाटील यांचा देसूर युवक काँग्रेसकडून सन्मान!
देसूर : भारतीय सैन्य दलात (Agniveer Technical) पदावर निवड झालेल्या देसूर येथील सुपुत्र अनिरुद्ध पाटील यांचा देसूर युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवेचे व्रत घेतलेल्या अनिरुद्ध यांच्या कार्याचा गौरव या सोहळ्याद्वारे करण्यात आला. यावेळी बोलताना उचगाव ब्लॉक युवक काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकट पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta