बेंगळूर : दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत आल्यानंतर आम आदमी पक्ष दक्षिणेकडील राज्य कर्नाटकात तिसरे सरकार स्थापन करेल, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ते गुरुवारी कर्नाटकात आम आदमी पक्षाच्या (आप) निवडणूक मोहिमेला सुरुवात करताना बोलत होते. नॅशनल कॉलेजच्या मैदानावर झालेल्या रॅलीत बोलताना केजरीवाल यांनी कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेने …
Read More »हुतात्म्यांच्या वारसांना श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून मदत
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या आजारी पत्नी लक्ष्मीताई बेन्नाळकर यांना महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुंबईच्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून उपचारासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मीताई बेन्नाळकर यांना प्रकृती खालावल्यामुळे केएलई हॉस्पिटलमध्ये …
Read More »‘ज्ञानदीप’तर्फे विविध विधायक उपक्रम राबविणार : वाय. पी. नाईक
बेळगाव : सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे सलग सोळा वर्षे सामाजिक विधायक उपक्रम राबविले जातात. मागील दोन वर्षे कोरोना काळात बंधने आली होती. मात्र आता शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार ज्ञानदीपतर्फे आयोजित बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी एस. आर. मांगले होते. ज्ञानदीपतर्फे यापूर्वी क्रीडा विभाग, …
Read More »संकेश्वरात भगवान श्री पार्श्वनाथ मदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी…..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील पार्श्वलब्दीपूरम येथील नूतन सांख्येश्वर पार्श्वनाथ मंदिरावर आज सकाळी सकाळी 11.30 वाजता हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. मंदिरावर हेलिकॉप्टरने होणारी पुष्पवृष्टी पहाण्यासाठी संकेश्वर परिसरातील मुले-मुली युवक-युवती आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत पुष्पवृष्टी करणारे दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेर्यातून टिपून घेतले. पादगुडी, नमाजमाळ, …
Read More »मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांची असि. कमिशनर चंद्रप्पा यांच्याशी चर्चा
बेळगाव : बेळगाव कॅम्प पोलिस स्टेशनचे असिस्टंट कमिशनर श्री. ए. चंद्रप्पा यांनी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांची आज तातडीची बैठक बोलावून शिवजयंती उत्सव आणि शिवजयंती मिरवणूकीसंदर्भात चर्चा केली. मध्यवर्ती मंडळातर्फे 2 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार असून 10 वाजता छत्रपती …
Read More »पंजाबच्या पैलवानांना हरवणारे पैलवान शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या आखाड्यात तयार केले : डॉ. जयसिंगराव पवार
पत्रकार पी. ए. पाटील लिखित पुस्तक प्रकाशन तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राजश्री शाहू महाराजांनी पंजाबच्या पैलवानांना हरवणारे पैलवान कोल्हापूरच्या आखाड्यात घडवले, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. ते रविवारी पैलवान विष्णू जोशीलकर यांच्या जीवन चरित्रावरील ग्रंथ ’रग तांबड्या मातीची…. झुंज वाघाची’ या पत्रकार पी. ए. …
Read More »हिंदूंवर आक्रमण करणार्या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची ‘इकोसिस्टिम’ समजून घेणे आवश्यक! : श्री. सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज
भारताची मुख्य सुरक्षा यंत्रणा असलेल्या राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे दंगल होते, हे लज्जास्पद आहे. हे सर्व अचानक झाले नसून हे सर्व पूर्वनियोजित होते, असे आता समोर येत आहे; मात्र अशा दंगली काही नवीन नसून नेहमीच विविध दंगलीत हिंदूंवर दगडफेक आणि आक्रमण करणारे धर्मांध मुसलमान असतात. हे जगभर चालू आहे. या …
Read More »रोटरी ई -क्लबचा 24 रोजी आर्ट उत्सव
बेळगाव : रोटरी ई -क्लब बेळगाव यांच्यातर्फे जी.एस.एस. कॉलेज, गुलमोहर बाग (कलाकार संघ) आणि तरुण भारत ट्रस्ट यांच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 24 एप्रिल रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आर्ट उत्सव अर्थात कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील जी.एस.एस. व आर.पी.डी. कॉलेज आवारामध्ये या कला उत्सवाचे …
Read More »बसवेश्वर, शंकराचार्य आणि बेळवडी मल्लम्मा जयंती मोठ्या उत्साहात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
बेळगाव : महात्मा बसवेश्वर, शंकराचार्य आणि बेळवडी मल्लम्मा या महान व्यक्तींच्या जयंत्या भव्य प्रमाणात साजऱ्या करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सदर महान व्यक्तींच्या जयंत्यांचे आचरण कशापद्धतीने करण्यात यावे, यावर विचारविनिमय करण्यासाठी पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. वीरशैव आणि बसव जयंती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »बेळगाव साहित्य संमेलनास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती
बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेतर्फे आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेतर्फे येत्या 8 मे 2022 रोजी तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta