Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

रोपांना राखी बांधून अनोखा केला अनोखा रक्षाबंधन!

चाऊस भगिनींचा उपक्रम : कुटुंबातच पर्यावरणाचा वसा निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गुरुवारी विविध उपक्रमांनी रक्षाबंधन सोहळा साजरा झाला त्यानिमित्त प्रत्येक कुटुंबातील महिला व युतीने आपल्या भाऊरायाला राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. पण निपाणी येथील चाऊस कुटुंबियातील फिदा आणि सबा चाऊस भगिनींनी रोपांना राखी बांधून अनोख्या …

Read More »

अर्थव्यवस्था ढासळत असताना राजकारण्यांनी आश्वासनांची खैरात करणं चिंताजनक : सर्वोच्च न्यायालय

  नवी दिल्ली : निवडणुका आल्या की नेतेंडळी जनतेला मोठ्या प्रमाणावर आश्वासनं देत असतात. यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश होतो. वीजबिल माफी, मोफत दिल्या जाणार्‍या वस्तू वगैरे आश्वासनं तर अगदी नेहमीची वाटावी इतकी सर्रासपणे दिली जातात. मात्र, अशा प्रकारे मोफत वस्तू वाटप वगैरे दिल्यामुळे त्याचा देशावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असं …

Read More »

हर घर तिरंगा जनजागृतीसाठी श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूरची जनजागृती फेरी

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) यांच्या वतीने फेरी काढण्यात आली. प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही फेरी विविध घोषणा देत संपूर्ण अडकूर गावातील सर्व गल्यातून काढण्यात आली. हातामध्ये …

Read More »

निट्टूर ग्राम पंचायतीचे पीडीओ व क्लार्क लाचप्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूर (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीचे पीडीओ श्रीदेवी गुंडापूर व क्लार्क सिध्दापा नाईक यांच्यावर लाच प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या दोघावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. निट्टूर ग्राम पंचायतीच्या हद्दीतील प्रभूनगर (ता. खानापूर) येथील रामचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. वारसा दाखल प्रकरणी गेल्या …

Read More »

प्रा. श्री. बालाजी डी. आळंदे यांना पीएचडी पदवी प्रदान

  बेळगाव : प्रा. श्री. बालाजी डी. आळंदे यांना भौतिकशास्त्र विभाग RCUB च्या संगोळी रायन्ना प्रथम श्रेणीतील घटक महाविद्यालय बेळगांव कर्नाटकतर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. “लेझर डाईझच्या अल्ट्राफास्ट रिलॅक्ससेशन डायनॅमिक्सचा अभ्यास” या विषयावर भौतिकशास्त्रातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी 4 ऑगस्ट 2022 राजी प्रदान करण्यात आली. गुलबर्गा विद्यापीठ कलबुर्गी येथील …

Read More »

प्रेम प्रकरणातून धार्मिक हिंसाचार; दोघांचा मृत्यू

  कोप्पळ : कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील हुलीहायडर गावात दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोघांना मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पाशा वाली (22) आणि येनाकापा तलवाड (60), असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाकडून परिसरात कलम १४४ लागू करण्यात …

Read More »

खासदार संजय मंडलिकांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा

  कोल्हापूर : शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात सामील झालेले कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर आज शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. खासदार मंडलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आक्रमक शिवसैनिकांनी केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत संजय मंडलिक यांनी भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांचा …

Read More »

जगदीप धनकड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

नवी दिल्ली : देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनकड यांनी गुरुवारी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून त्यांनी ही शपथ घेतली. अलिकडेच पार पडलेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार धनकड यांनी विरोधी गोटाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला होता. धनकड …

Read More »

इदलहोंड ग्राम पंचायतीकडून सिंगीनकोप येथील कोसळलेल्या शाळा इमारतीची दखल

    खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर ) येथील ग्राम पंचायतीचे पीडीओ श्री. देसाई, सिंगीनकोप गावचे ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार, सदस्या सौ. माया कुंभार आदीनी नुकताच मुसळधार पावसामुळे सिंगीनकोप लोअर प्राथमिक मराठी शाळेची तीन वर्ग खोल्याची कौलारू इमारत कोसळून जमिनदोस्त झाली. याची दखल घेऊन लागलीच भेट देऊन पाहणी …

Read More »

15 ऑगस्ट रोजी मोठे रक्तदान शिबीर

बेळगाव : गेल्या 14 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन आणि बेळगाव येथील उप औषध नियंत्रक यांच्या प्रादेशिक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट रोजी महावीर भवन, बेळगावी येथे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे जितो फाउंडेशनच्या रक्तदान शिबिर समन्वयक …

Read More »