Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; सीबीआयने दाखल केलेली कागदपत्रे आरोपीच्या वकिलांना अमान्य

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात सीबीआयने न्यायालयात सादर केलेली पुराव्यांशी संबंधित तेरा महत्त्वाची कागदपत्रे अमान्य आहेत, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. त्यामुळे सीबीआयच्या विशेष सरकारी वकिलांना साक्षीदारांची यादी (लिस्ट ऑफ विटनेस) देऊन ही कागदपत्रे सिद्ध करावी लागणार आहेत. याप्रकरणी 13 ऑक्‍टोबर रोजी …

Read More »

श्रीराम कॉलनीत आम. अभय पाटील यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांना प्रारंभ

बेळगाव : आज गुरुवारी महालक्ष्मी सोसायटी व श्रीराम कॉलनी, आदर्श नगर परिसरात विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून सदर परिसरात विविधकामांना मंजुरी मिळाली आहे. गोपाल मिरजकर, विनय बेहरे, प्रदीप जोशी, डॉ. मृगेन्द पट्टणशेटी व इतर उपस्थित मंडळींच्या हस्ते श्रीफळ वाढवून विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आम. …

Read More »

यल्लम्मा देवी यात्रेस परवानगी द्यावी : कोल्हापूर जिल्हा रिक्षा सेनेची मागणी

बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीची यात्रा मंगळवार दि. 19 ऑक्टोबर रोजी होत असून यादिवशी प्रशासनाने कोरोना नियमांच्या चौकटीत सौंदत्ती येथील यल्लम्मा देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करून घ्यावे तसेच यात्रेस अनुमती द्यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेना रिक्षासेनेच्यावतीने करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा शिवसेना रिक्षासेना प्रमुख राजेंद्र शंकरराव जाधव यांनी …

Read More »

शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांची बेळगावला धावती भेट

शिवसेना बळकटी संदर्भात दिल्या सल्ला-सूचना बेळगाव : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आणि मुंबई बेस्टचे माजी चेअरमन अरुण दुधवाडकर यांनी आज बेळगावला धावती भेट दिली. मुंबईहून विमानाने बेळगावला दाखल झालेल्या अरुण दुधवाडकर यांचे बेळगाव विमानतळावर बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अरुण दुधवाडकर …

Read More »

दसरा आणि दिवाळी निमित्ताने स्पेशल रेल्वेची बेळगाव सिटीझन फोरमतर्फे मागणी

बेळगाव : बेळगाव सिटीझन फोरमतर्फे आज अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव रेल्वे स्टेशनचे नवनियुक्त स्टेशन व्यवस्थापक पी. नागराज यांची भेट घेण्यात आली. त्यांच्याकडे दसरा आणि दिवाळी सणांच्या निमित्ताने स्पेशल रेल्वे सेवांची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालय आणि जीएम एसडब्ल्यूआर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. दसरा …

Read More »

सीमाभागात रुजते गांजाशेती!

निपाणी, रायबाग तालुक्यातील शेतकरी : झटपट श्रीमंतीच्या मोहाला बळी निपाणी : श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकरी गांजा पिकाकडे वळताना दिसत आहेत. गांजाची लागण करताना कमालीची गोपनीयता पाळली जाते. सीमाभागातील निपाणी कागल, चिक्कोडी, रायबाग तालुक्यात अनेक गावांमध्ये ऊस, सूर्यफूल आदी पिके घेतली जातात. यामध्ये गांजा लागवड केली जात आहे. वरील तालुक्यातील अनेक गावात …

Read More »

वनहक्क कायद्याची खानापूर तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; निवेदनाव्दारे मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : वनहक्क कायद्याची खानापूर तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा मागणीचे निवेदन उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांना खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीचे निमंत्रक महादेव मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुक्यातील अनेक शेतकरी वनहक्कापासून वंचित आहेत. त्यांना वनहक्क मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे लढत आहेत. …

Read More »

सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावा : मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी

पोलिस प्रशासनाकडून व्यापार्‍यांना सूचना निपाणी : शहर आणि उपनगरात वाढत चाललेल्या चोरीच्या व लुटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहराकरिता आमदार फंडातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. असे असले तरी अडचणीच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी व्यापारीवर्गाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी केले. बसवेश्वर पोलिस चौक ठाण्यात आयोजित …

Read More »

शेतकर्‍यांवर अन्याय करणार्‍या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा

राजू पोवार : रयत संघटनेच्या बैठकीत मागणी निपाणी : उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचारात चार शेतकर्‍यांचा बळी गेला आहे. सर्व शेतकरी रस्त्यावरून जात असताना मंत्री पुत्राने त्यांच्या ताफ्यावर भरधाव वाहन चालवून अमानुष कृत्य केले आहे. त्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून मंत्री पुत्रावर कारवाई करण्यासह अजय मिश्रा या …

Read More »

मंदिरे झाली खुली : भाजपाचा आनंदोत्सव

मंदिरासभोवती व्यापाराला परवानगी द्या कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्याच्या जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना कुलुपात बंद करुन ठेवले होते. या अन्याया विरोधात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विविध मार्गाने आंदोलन केली. आज या सर्व आंदोलनांना …

Read More »