निपाणी (वार्ता) : गेल्या काही महिन्यापासून शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला होता. अखेर दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यामध्ये बसवेश्वर चौक पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांना यश आले आहे. त्यामध्ये आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहेत. इतर सोन्या-चांदीच्या वस्तूसह 3 लाख 46 हजार 688 रुपयाचा समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली …
Read More »स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
उचगाव : गुरु शिष्याचे नाते हे प्राचीन काळापासून चालत आले आहे. प्रगत तंत्रज्ञानात गुरूंचा आदर व्यक्त करण्यासाठी केलेला हा सोहळा पाहून आम्ही धन्य झालो. शिष्यांच्या जीवनातील अंधकाराचा नाश करून राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी गुरु शिष्य नाते हेच सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष 130 या …
Read More »म. ए. समितीच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकार्यांसमवेत विविध विषयांवर चर्चा
बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज दुपारी बेळगावचे जिल्हाधिकारी श्री. हिरेमठ यांची भेट घेऊन त्यांच्या बरोबर सीमाभागातील मराठी भाषिक अल्पसंख्याकांचे प्रश्नाबाबत चर्चा केली. कासरगोड जिल्ह्यातील कन्नड भाषिक अल्प संख्याकांचे संदर्भात केरळ सरकारने अल्पसंख्यांक आयोगाला दिलेल्या परिपत्रकाचा संदर्भ देत महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. …
Read More »गर्लगुंजीत लक्ष्मी मंदिराच्या नूतन इमारतीच्या स्लॅबकौलाचा शुभारंभ
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावच्या ग्राम दैवत श्री महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करून नूतन इमारत उभारण्यात आली आहे. इमारतीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मंदिराच्या इमारतीचे रंगकामही प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर सोमवारी दि. 31 जानेवारी रोजी श्री महालक्ष्मी मंदिराच्या नूतन इमारतीच्या स्लॅबकौलाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित …
Read More »खानापूरात मोकाट जनावराला वाहनाची धडक
खानापूर (वार्ता) : बेळगाव-पणजी महामार्गावरील खानापूरातील आंबेडकर गार्डन जवळ मोकट जनावरे सायंकाळी जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने जनावराचे तोंड फुटून गेले. मात्र अज्ञात वाहनाने पलायन केले. ही माहिती मिळताच खानापूरातील सामाजिक कार्यकर्ते व पशुमित्र प्रज्योत दलाल, दिपक सुतार, निलेश सडेकर, अवधूत परब, सुरज कदम, श्री पाटील, संदिप चौगुले …
Read More »बेळगांव-पणजी महामार्गावर मराठीत फलक बसवा
युवा म. ए. समितीची मागणी खानापूर (वार्ता) : बेळगाव – पणजी महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. बेळगांवपासून लोंढ्यापर्यंतचा भाग हा मराठी भाषिक भाग म्हणून ओळखला जातो. या भागात 80 टक्के जनता मराठी भाषिक आहे. अशा मराठी जनतेसाठी मराठी भाषेतून फलक उभारावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने …
Read More »आडमार्गाने कर्नाटक हद्दीत प्रवेश करू पाहणाऱ्या दोन खाजगी बसेसवर कारवाई
बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी चेकपोस्ट नाक्यावर कोरोना निगेटिव्ह चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांनाच कर्नाटक हद्दीत प्रवेश दिला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने सीमावर्ती चेकपोस्टच्या ठिकाणी कडक तपासणी करण्यात येत आहे, तथापि काही वाहनचालक ही तपासणी चुकविण्यासाठी आडमार्गाने कर्नाटक …
Read More »वर्षभरात २५ हजार कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग बांधणार
रस्ते वाहतुकीसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा नवी दिल्ली : दोन वर्ष करोनामुळे आर्थिक फटका सहन करणाऱ्या देशासाठी यंदाच्या अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. करोनाची लाट ओसरत असताना अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान या वर्षी देशासमोर असणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या इतर अनेक घोषणांसोबत देशात पायाभूत सुविधांमध्ये …
Read More »गुंजी येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न
खानापूर : गुंजी येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. भारतीय संस्कृती ही प्राचीन असून यामध्ये स्त्रीला घरची लक्ष्मी मानले जाते. संस्कृती टिकविणे हे केवळ तिच्याच हातात आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सरिता पाटील यांनी केले. गुंजी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात त्या …
Read More »महिला आघाडीतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : महिला आघाडीतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे हळदी-कुंकू कार्यक्रम महिला आघाडीच्या शनिवार खुट हॉलमध्ये कोविड नियमांचे पालन करून उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रीनिवास जाधव आणि डॉक्टर नाझीब कोतवाल उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात अर्चना देसाई यांच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फोटो पूजन आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta