Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

जायंट्स मेन संस्थेचा अधिकार ग्रहण समारंभ उद्या

बेळगाव (प्रतिनिधी) : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन ) या सेवाभावी संस्थेचे नुतन अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ व सहकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ रविवार दिनांक 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.डॉ. एस. पी. एम. रोडवरील शिवम हॉल येथे संध्याकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आ. अभय …

Read More »

घुमटमाळ मारुती मंदिरात विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

बेळगाव : हिंदवाडी येथील पुरातन असलेल्या श्री घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार व शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री वारकरी भजनाचा कार्यक्रम झाला. शनिवारी पहाटे चार वाजता हनुमान मूर्ती अभिषेक, पाच ते सात वाजेपर्यंत श्रीकृष्ण मूर्ती बोंगळे यांचे कीर्तन झाले त्यांनी हनुमंताच्या जन्माची कथा कीर्तनातून …

Read More »

महाराष्ट्रासह चार राज्यांमधील पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील लोकसभेची एक आणि महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रसने तर महाराष्ट्र, छत्तीसगड काँग्रेसने तर बिहारमध्ये आरजेडीने बाजी मारली आहे. या निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष वेधले होते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची बाजी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तृणमूल …

Read More »

बळीराजा सुखी होऊ दे : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर (जिमाका) : राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत, खर्‍या अर्थाने जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सुखी होऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त होऊ दे! अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबाला आज साकडे घातले. जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा …

Read More »

जयश्री जाधवांचा मोठा विजय; कोल्हापुरात भाजपचा करेक्ट कार्यक्रम!

कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या अडिच वर्षांच्या कामगिरीची परिक्षा ठरलेल्या आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव या 18,901 मतांनी विजयी झाल्या आहेत. कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात लढलेल्या गेलेल्या या निवडणुकीत ‘आण्णांच्या माघारी, आता आपली जबाबदारी’ ही टॅगलाईन खरी करत महाविकास आघाडीने …

Read More »

गुरुवंदना कार्यक्रमाच्या प्रचार पत्रकाचे अनावरण

बेळगाव : बेळगाव सकल मराठा समाजातर्फे येत्या 15 मे रोजी गुरुवंदना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी पत्रकाचे अनावरण मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे स्वागत गुणवंत पाटील यांनी केले. यावेळी डॉ. समीर कुट्रे, डॉ. अनिल पोटे, रमाकांत कोंडुस्कर, मिलिंद भातकांडे, विजय …

Read More »

बेळगाव नागपूर स्टार एअरच्या विमान सेवेस सुरुवात

बेळगाव : स्टार एअर कंपनीने बेळगाव ते नागपूर हे नवे विमान आजपासून सुरू केले या नव्या विमानाला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एक छोटेखानी कार्यक्रम करून नव्या विमानाची सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानतळावर स्टारएअरने आयोजित छोटा कार्यक्रम आकर्षण ठरला. रिबन कटिंग, दिवाबत्ती आणि केक कटिंग करण्यात …

Read More »

भाजप-काँग्रेसला आत्महत्येवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही : भास्कर राव

बेळगाव : ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणावर भाजप आणि काँग्रेसला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. दोन्ही पक्ष मगरीचे अश्रू ढाळत आहेत असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते व निवृत्त आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी केला. बेळगावमध्ये शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आयपीएस अधिकारी आणि आप पक्षाचे नेते भास्कर राव म्हणाले की, कंत्राटदार …

Read More »

एक मुखाने बोला, जय जय हनुमान! निपाणीत हनुमान जयंती साजरी

धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात शनिवारी (ता.16) हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयार करण्यात आली होती. यानिमित्त विविध मंडळे, ट्रस्ट आणि मंदिर प्रशासनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे सहा वाजल्यापासून अनेक मंदिरात ’एक मुखाने बोला, जय जय हनुमान’चा गजर सुरू होता. दिवसभर शहर …

Read More »

पंजाबमध्ये आप सरकारने करून दाखवलं! 1 जुलैपासून प्रत्येक घरात 300 युनिट वीज मोफत

चंदीगड : पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या भगवंत मान सरकारने सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वीज देण्याच्या आश्वासनाबाबत मोठी घोषणा केली आहे. पंजाब सरकारकडून शनिवारी पंजाबमधील प्रत्येक घरात 300 युनिट वीज मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा नवा नियम येथे 1 जुलै 2022 पासून लागू होईल. …

Read More »