Sunday , December 21 2025
Breaking News

Belgaum Varta

भटक्या कुत्र्यांचा बकर्‍यांच्या कळपावर हल्ला : 6 बकरी ठार

बेळगाव : शाळेच्या आवारात बसवलेल्या बकर्‍यांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला करून 6 बकर्‍यांना ठार केले. या हल्ल्यात 3 बकरी गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना शिवबसव नगरातील कन्नड शाळेच्या आवारात काल रात्री घडली. बेळगाव तालुक्यातील मुतगा गावचे मेंढपाळ नरसू रायप्पा कुंपी आणि अन्य 7-8 मेंढपाळांच्या सुमारे 400 बकर्‍यांचा कळप …

Read More »

28 पासून यल्लमा देवस्थान होणार खुले

बेळगाव : कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवस्थान येत्या मंगळवार दि. 28 सप्टेंबरपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील चार प्रमुख देवस्थानांसह आता श्री यल्लमा देवस्थान खुले होणार असल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू …

Read More »

तोपिनकट्टीत पौष्टीक आहार कार्यक्रम संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टीत (ता. खानापूर) येथे अंगणवाडी केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सौजन्याने पौष्टिक आहार कार्यक्रम नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर उपस्थित होते.तर कार्यक्रमाला ग्राम पंचायत अध्यक्षा गीता हलगेकर, उपाध्यक्ष मारूती गुरव, सर्व सदस्य, सीडीपीओ राममुर्ती, सुपरवायझर श्री. केरूर, श्रीमहालक्ष्मी सोसायटीचे गुंडू पाखरे आदी …

Read More »

बेळवट्टी – कर्ले रस्ता पावसामुळे गेला वाहून

बेळगाव : बेळवट्टी ते कर्ले रस्ता पावसामुळे कर्ले शिवरातून वाहून गेला आहे तसेच २ कि.मी. रास्ता हा पूर्णतः खड्डयांनी व्यापला आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच बेळवट्टी गावाशेजारील असलेला पूलही अर्धा वाहून गेल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः धोक्याची झाली आहे. तरी या भागातील …

Read More »

कंग्राळीत जलजीवन मिशन योजनेला प्रारंभ

बेळगाव : कंग्राळी (खु.) येथील केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेचा प्रारंभ खा. मंगला अंगडी व आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यातून ग्रामस्थांना घरोघरी नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्‍या योजनेसाठी 4 कोर्टीचा निधी मंजूर झाला आहे. प्रारंभी ग्रा. पं. …

Read More »

मुख्यमंत्री बोम्माई 25, 26 रोजी बेळगावात

बेळगाव : राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई येत्या शनिवार दि. 25 व रविवार दि. 26 सप्टेंबर असे सलग दोन दिवस बेळगाव दौर्‍यावर येणार असून ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये विजय झालेल्या भाजपच्या उमेदवारांनी नुकतीच बेंगलोर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण लवकरच बेळगाव दौर्‍यावर येत …

Read More »

निपाणी रोटरी क्लबचा उद्या पदग्रहण सोहळा

माजी जिल्हा प्रांतपाल इस्माईल पटेल यांची उपस्थिती : ऑक्सिजन कॉन्स्टेटरचे उद्घाटन निपाणी : निपाणी रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा सोशल डिस्टन्सनुसार बुधवारी (ता. 22) सायंकाळी 5 वाजता येथील रोटरी हॉलमध्ये होणार आहे. सातारा येथील माजी जिल्हा रोटरी प्रांतपाल इस्माईल पटेल यांच्या हस्ते बेळगाव जिल्हा रोटरीचे माजी सहाय्यक प्रांतपाल विक्रम जैन यांच्या …

Read More »

गांधी चौकात उभारणार पुतळा : निपाणी पालिकेकडून पाहणी

3 महिन्यात होणार काम पूर्ण निपाणी : येथील गांधी चौकात बर्‍याच वर्षापासून महात्मा गांधी पुतळाची प्रतीक्षा होती. अनेक वेळा मागणी करूनही तांत्रिक अडचणीमुळे मागणी पूर्ण झाली नव्हती. अखेर उशिरा का होईना निपाणी नगरपालिकेच्या वतीने शहरातील गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शहरवासी …

Read More »

इंदिरा कॅन्टीनवरील खर्च : चौकशीची मागणी

बेळगाव : गरिबांना अत्यंत माफक दरात जेवायला मिळावे यासाठी सरकारने इंदिरा कॅन्टीन सुरू केले आहे. बेळगावातही अशी 6 कॅन्टीन असून त्यांच्यावर सरकारकडून दररोज 3 लाख 37 हजार 500 रुपये खर्च केले जातात. मात्र या इंदिरा कॅन्टीनमधील जेवणाचा दर्जा निकृष्ट असून यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याने त्याची तात्काळ सखोल चौकशी केली जावी, …

Read More »

शिवसेनेने दसरा मेळाव्यापूर्वी भाजपसोबत यावे : रामदास आठवले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांत मोठी चिखलफेक सुरु असल्याचे पाहायला मिळते. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपामुळे राजकीय वातावर चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहणं शिवसेनेसाठी …

Read More »