Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

एनयूजेएम संघटनेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती साजरी

बेळगाव (वार्ता) : स्वामी विवेकानंद यांनी देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी केलेले कार्य अतुलनीय असे होते असे विचार स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आले. येथील नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस संघटनेच्या बेळगाव शाखेतर्फे बुधवारी स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन …

Read More »

युवा समितीतर्फे स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती साजरी

बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आज स्वराज्यजननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती त्याच बरोबर स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी म. ए. युवा समितीच्या पदाधिकार्‍यांनी म. ए. युवा समितीच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी म. ए. युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत …

Read More »

मराठा मंदिरतर्फे जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

बेळगाव (वार्ता) : ’कोरोनामुळे इच्छा असूनही आपण राष्ट्रमाता जिजाऊ आणि युवकांचे स्फूर्तिस्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करू शकत नाही पण तरीही त्यांचे स्मरण करणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच यंदाही आम्ही साधेपणाने या दोन महान व्यक्तींची जयंती साजरी करीत आहोत’ असे विचार मराठा मंदिरचे अध्यक्ष उद्योजक …

Read More »

खानापूर टाऊन पंचायत मुख्य अधिकारी पदी माने

खानापूर (वार्ता) : खानापूर शहरातील टाऊन पंचायतीच्या मुख्य अधिकारीपदी बाबासाहेब माने यांनी मंगळवारी दि. 11 रोजी आपल्या पदाची सुत्रे स्विकारली. खानापूर टाऊन पंचायतीच्या मुख्य अधिकारी विवेक बन्ने यांची बेळगाव येथे बदली झाली. त्यामुळे खानापूर टाऊन पंचायतीचे मुख्य अधिकारी पद रिक्त होते. त्या पदी बाबासाहेब माने रूजू झाले. बाबासाहेब माने यांनी …

Read More »

गाणिग समाजाला 2 ए प्रमाणपत्र व सिधुत्व प्रमाणपत्राची निवेदनाद्वारे मागणी

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील गाणिग समाजाच्या विद्यार्थी वर्गाला 2 ए प्रमाणपत्र तसेच सिधुत्व प्रमाणपत्र देण्यात यावे. या मागणीसाठी खानापूर तालुका गाणिग समाज अभिवृध्दी संस्थेच्यावतीने उपतहसीलदार के. आर. कोलकार यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गाणिग समाजाच्या विद्यार्थी वर्गाला शिक्षणासाठी 2ए प्रमाण पत्र तसेच सिधुत्व प्रमाणपत्र देण्याची …

Read More »

मंदिरेही समाजाच्या हिताची ठरावीत : एन. एस. चौगुले

बेळगाव (वार्ता) : मंदिरेही समाज हितासाठी आदर्श ठरावीत. सुळगा येथील मळेकरणी देवीचे मंदिर हे त्यापैकीच एक आहे, असे प्रतिपादन एन. एस. चौगुले याने केले ते सुळगा (हिं.) येथील मळेकरणी देवीच्या मंदिराचा उद्घाटन कार्यक्रमात उद्घाटक या नात्याने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण चौगुले होते. हा कार्यक्रम सोमवार (दि. 10) झाला. प्रास्ताविक …

Read More »

अतिथी प्राध्यापकांचे खानापूर तहसीलदारांना निवेदन

खानापूर (वार्ता) : कर्नाटक राज्यातील पदवी महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणून गेली कित्येक वर्षे अत्यंत कमी पगारात सेवा बजावत आहेत. खानापूर शहरातील सरकारी पदवी महाविद्यालय तसेच बिडी येथील पदवी महाविद्यालय येथे अनेक प्राध्यापक कमी पगारात सेवा बजावत आहेत. कमी पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तेव्हा अतिथी प्राध्यापकांना …

Read More »

बेळगाव अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी यांची सीमा तपासणी नाक्याला भेट

कोगनोळी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे नवीन अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या कर्नाटक सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख महानिंग …

Read More »

रुग्ण सापडूनही निपाणीकर बिनधास्त

प्रशासनाकडून उपायोजना नाही : शाळा बंद बार सुरू निपाणी (वार्ता) : शहरात दोन दिवसांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला असून एकूण पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे निपाणीत गेल्या तीन-चार दिवसांत रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्यामध्ये एका पोलीस कर्मचार्‍यांसह अन्य एकाच कोरोनाची लागण झाली. तीन दिवसांपूर्वी प्रतिभा नगर येथील 36 वर्षीय महिलेला …

Read More »

’ब्रेक के बाद’ पुन्हा शाळा बंद!

कोरोनाचे संकट : ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य निपाणी (वार्ता) : राज्यात कोरोना संक्रमणामुळे नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मंगळवार (ता.11) पासून मंगळवार पर्यंत (ता.18) इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्षरीत्या बंद झाले आहेत. नव्या आदेशामुळे शाळांतील किलबिलाट पुन्हा थांबलेला आहे. शाळा बंद शिक्षण सुरू याअंतर्गत ऑनलाईन वर्गाला काही …

Read More »