Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

लाच प्रकरणी एसडीसीवर कारवाई

बेळगाव : दहावीच्या मार्क्स कार्डमध्ये नावात दुरुस्ती करून देतो असे सांगत बाराशे रुपयांची लाच मागणार्‍या सौंदत्ती तालुका गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा क्लार्क वेंकरेड्डी हनुमरेड्डी नगली याला एसीबीने रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे. सौंदत्ती तालुक्यातील हिरेबुधनूर गावच्या मारुती गौडा पाटील आणि त्यांचे मित्र दोघांनी मिळून एसएसएलसीच्या गुणपत्रिकेमध्ये चुकलेले नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्ज …

Read More »

मंदिरांच्या विकासासंदर्भात पर्यटन मंत्र्यांची आम. बेनके यांनी घेतली भेट

बेळगाव : बेळगावचे आमदार अ‍ॅड. अनिल बेनके यांनी आज बुधवारी सकाळी भारत सरकारच्या पर्यटन आणि बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन बेळगाव परिसरातील मंदिरांचा विकास आणि जीर्णोद्धारासाठी पर्यटन खात्याकडून 500 लाख (5 कोटी) रुपयांचा निधी मंजूर करण्याची विनंती केली. बेळगाव परिसरातील 4 …

Read More »

अभिषेकच्या खून प्रकरणी पोलिसांचे कानावर हात!

निपाणी (वार्ता) : मूळ राहणार सैनिक टाकळी (ता. हातकणंगले) आणि सध्या राहणार निराळे गल्ली येथील अभिषेक शिवानंद दत्तवाडे या युवकाच्या खून प्रकरणात सहभागी अल्पवयीन संशयित स्वत:हून पोलिसांत हजर झाला होता. दरम्यान मंगळवारी (ता.5) पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी चालविण्याचे वृत्त सूत्रांकडून समजते. तरीही बुधवारी (ता.6) सायंकाळी निपाणीच्या मंडल …

Read More »

बागेवाडी महाविद्यालयास नॅककडून ’ए’ मानांकनाची हॅट्ट्रिक!

अमर बागेवाडी : दोन दिवस घेतला प्रगतीचा आढावा निपाणी (वार्ता): बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाला मंगळवारी (ता. 29) व बुधवारी (ता. 30) या दोन दिवशी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळ (नॅक) कमिटीने भेट दिली. दोन दिवसांत नॅक कमिटीने महाविद्यालयाचा दर्जा, गुणवत्तेसह सर्वांगीण विकासाचा आढावा घेतला. त्यानंतर …

Read More »

जीवनात नेहमी धडपड आवश्यक!

परमात्मराज महाराज : ’अंकुरम’च्या शाळा इमारतीचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : जीवनात चांगली कामे होण्यासाठी मोठा जनसमुदाय मागे असणे आवश्यक आहे. विश्वासाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. त्यासाठी विश्वास असणे अत्यंत महत्वाचे आहे. शुद्ध संकल्पनेमुळे यश निश्चित मिळते, असे मत आडी येथील दत्त देवस्थान मधील परमाब्धिकार परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केले. येथील …

Read More »

बेळगाव विमानतळावर राज्यातील पहिली ॲम्बुलिफ्ट सुविधा

बेळगाव : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) बेळगाव विमानतळावर पॅसेंजर बोर्डिंग लिफ्ट (पीबीएल) अर्थात ॲम्बुलिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कर्नाटकात अशाप्रकारे पहिल्यांदाच ही सुविधा उपलब्ध झाली आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांसाठी बोर्डिंग वाहन म्हणून ॲम्बुलिफ्टचा वापर केला जातो. कमी गतिशील (पीआरएम) किंवा अपंग विमान प्रवासी, प्रामुख्याने व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तींना …

Read More »

संकेश्वरात देवरदेवांग दासीमयन्नावर जयंती उत्सव

संकेश्वर (प्रतिनिधी) :  संकेश्वर श्री बनशंकरी देवालयात कोष्टी (देवांग) समाजातर्फे देवरदेवांग दासीमयन्नावर यांची 1043 वी जयंती भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. संकेश्वर नेकार हटकर समाजाचे अध्यक्ष दुंडेश शिडल्याळी यांनी देवरदेवांग दासीमयन्नावर प्रतिमेचे पूजन केले. यावेळी बोलताना समाजाचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब हेदुरशेट्टी म्हणाले आद्य वचनकार, नेकार संत देवरदेवांग दासीमयन्नावर यांची जयंती …

Read More »

बेळगावसह खानापूर तालुक्यात उद्या वीज पुरवठा खंडित

बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव 110 के.व्ही. मच्छे केंद्राच्या व्याप्तीत येणाऱ्या बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील कांही गावांचा वीज पुरवठा उद्या गुरुवार दि. 7 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खंडित होणार आहे. बेळगाव व खानापूर तालुक्यातील उद्या वीज पुरवठा खंडित केला जाणारा भाग पुढीलप्रमाणे आहे. बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी, कुट्टलवाडी, …

Read More »

रेल्वे स्थानकावर शिवरायांची प्रतिमा बसवण्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांकडे आम. बेनके यांची मागणी

बेळगाव : पुनर्निर्मित बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्याने व्यक्त होणाऱ्या तीव्र संतापाची दखल घेत उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव रेल्वे स्थानकावर श्री छ. शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा उभाराव्यात, अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दादाराव दानवे यांच्याकडे केली आहे. बेळगावचे …

Read More »

सामुदायिक उपनयन समारंभ 11 मे रोजी

बेळगाव : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि समर्थ सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामुदायिक उपनयन समारंभ बुधवार दि. 11 मे 2022 रोजी होणार आहे. चिदंबर नगर येथील चिदंबरेश्वर देवस्थानात होणाऱ्या या समारंभात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अरविंद कुलकर्णी 9341111357, सुहास कुलकर्णी 9448036915 किंवा अभय जोशी 9845517766 यांना संपर्क साधावा असे आवाहन …

Read More »