खानापूर : शेजारच्या गोवा आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरीयंटचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खानापूर तालुक्यातील चोर्ला राज्यमार्गावरील कणकुंबीत चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे. चोलामार्गे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अथवा कोरोना लसीकरण झाल्याचा दाखला दाखविणाऱ्यांनाच प्रवेश दिला …
Read More »तेरा वर्षीय बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील एका मुलीचा डेंग्यूमुळे आज शुक्रवारी दुपारी केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूमुळे गावात डेंग्यू संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्यातील मरगाई गल्ली, हलगा येथील 13 वर्षीय बालिका हर्षदा भीमराव संताजी असे डेंग्यूमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. गेल्या कांही दिवसापासून हर्षदा …
Read More »शाळा खोल्या दुरूस्तीसाठी चापगाव ग्रा. पं.चे निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील चापगांव मराठी प्राथमिक शाळेच्या तीन खोल्या आणि कन्नड प्राथमिक शाळेची खोली अशा चार खोल्या कोसळण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा शिक्षण खात्याच्यावतीने चारही खोल्या लवकरात लवकर दुरूस्त करून विद्यार्थी वर्गाची सोय करावी. अशा मागणीचे निवेदन शिक्षण खात्याच्या बीईओ कार्यालयाला देण्यात आले. यावेळी बीईओ कार्यालयाचे मॅनेजर प्रकाश होसमनी …
Read More »जामगावात नेटवर्क अभावी ऑनलाईन अभ्यास कसा होणार?
खानापूर (सुहास पाटील यांजकडून) : खानापूर तालुक्यातील अतिमागासलेल्या आणि दुर्गम अशा जंगल भागातील शिरोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जामगाव (ता. खानापूर) भागात नेटवर्क नसल्याने शिक्षकांनी दिलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा बट्टयाबोळ झाला आहे.सध्या कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईनचे धडे घ्यावे लागत आहेत. परिस्थितीने गरीब असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना पालकाकडुन महागडे मोबाईल देऊन जामगावसारख्या भागात नेटवर्क नाही. …
Read More »महाराष्ट्र १o वी बोर्ड परिक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बोर्ड परिक्षा न झालेल्यामहाराष्ट्र राज्याच्या एस.एस.सी. बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दि. १६ जूलै रोजी दुपारी १ वाजता जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व …
Read More »नूतन जिल्हाधिकार्यांनी स्विकारला पदभार
कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून आज सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. श्री. रेखावार यांनी ऑगस्ट 2012 ते ऑगस्ट 2013 या काळात सिंधुदुर्ग येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले. गडचिरोली येथील इटापल्ली येथे ऑगस्ट 2013 ते फेब्रुवारी 2014मध्ये …
Read More »अन्न व औषध प्रशासनातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण
खाद्यपदार्थ विक्री व्यवसायिकांना प्रशिक्षण बंधनकारक : व्यवसायिकांना मिळणार प्रमाणपत्र निपाणी : केंद्र शासनाच्या एफएसएसएआय व फॉस्टॅक योजनेतून खाद्यपदार्थ आणि फळ विक्री व्यवसायिकांना अन्न व औषध प्रशासनातर्फे बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवसायिकांना हे प्रशिक्षण बंधनकारक असून त्यानंतर सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. …
Read More »म्युनिसिपल शाळेसाठी रस्त्यावर उतरणार!
डोंगरी भागातील माजी विद्यार्थ्यांचा निर्धार : ग्रामीण भागात बैठका निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी शहरासह ग्रामीण आणि डोंगरी भागाच्या सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या मुलांच्यासाठी कामधेनू ठरलेल्या निपाणी येथील मुन्सिपल हायस्कूल सरकारकडे हस्तांतरण करण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. त्यामुळे भविष्यकाळात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आणि पालकांची हेळसांड होणार आहे. त्यामुळे हस्तांतराचा …
Read More »दहावी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी बेळगाव तालुक्यातील शिक्षकांना मार्गदर्शन
बेळगाव : येत्या सोमवार दिनांक 19 व गुरुवार दिनांक 22 जुलै 2021 रोजी होणाऱ्या इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी म्हणून बेळगाव तालुक्यातील सर्व पी.ई. शिक्षक व स्काऊट अँड गाईड शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी मच्छे येथील डिवाइन मर्सी स्कूलमध्ये गुरुवार दिनांक 15 जुलै रोजी बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव तालुक्याचे …
Read More »खानापूरात पावसाची संततधार सुरूच
खानापूर (प्रतिनिधी) : आज चौथ्या दिवशीही खानापूर शहरासह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या, नाल्याच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे.तालुक्यातील खेडेगावात भात रोप लागवडीचे काम अजुन बऱ्याच ठिकाणी व्हायचे आहे. त्यामुळे भात रोप लागवडीला जोर आला आहे. यंदा पावसाने योग्य साथ दिली नाही. त्यामुळे रोप लागवडीचे काम रेंगाळले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta