Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

विधानपरिषद निवडणूक; तिरंगी लढतीने चुरस

निपाणीतील 534 मते कोणाच्या पारड्यात : राजकीय तर्कवितर्कांना उधाण निपाणी : येत्या 10 डिसेंबरला विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात तिरंगी लढत होणार असून भाजपचे महांतेश कवठगीमठ, काँग्रेसकडून चन्नराज हट्टीहोळी व लखन जारकीहोळी हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत. सर्वांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. दरम्यान या निवडणुकीत निपाणी तालुक्यात 534 …

Read More »

मलप्रभा साखर कारखान्याच्या चौकशीसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

खानापूर (प्रतिनिधी) : एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखाना विविध कारणांनी डबघाईत आला असताना सन् 2020-21 सालातील गळीत हंगामातील साखरेचा उतारा कमी दाखवून कारखाना संचालक मंडळाने 18 हजार क्विंटल साखर लाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शेतकरी वर्गाने वेळीच तपास लावून साखर सील बंद केली आहे. ही गंभीर बाब आहे. …

Read More »

अमर पोवार व शुभांगी पोवार यांना क्रांतिसूर्य समाजभूषण पुरस्कार जाहीर

कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथील भारतीय सेवा आश्रमचे संस्थापक अमर पोवार व संचालिका शुभांगी पोवार यांना कोल्हापूर येथील क्रांतीसुर्य फाउंडेशनच्यावतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या निवडीचे पत्र नुकतेच माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते त्यांना …

Read More »

अहो कमालच… दोन मिनिटात 111 प्राण्यांची नावे!

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद : निपाणीच्या अविनाश मानेचे यश निपाणी : अनेक बालकांमध्ये विविध कौशल्य भरलेली असतात. त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्याच्या विकासाला चालना दिल्यास नक्कीच यशाला गवसणी घालण्यास मदत होते. असाच निपाणी येथील 3 वर्षीय बालक अवनीश माने याने केवळ दोन मिनिटात 111 प्राण्यांची नावे सांगितली. त्याची इंडिया बुक ऑफ …

Read More »

निपाणीत प्रभाग क्रमांक 31मध्ये समस्यांचा डोंगर

नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन : खराब रस्त्यासह पथदीप नसल्याने अडचण निपाणी : येथील प्रभाग क्रमांक 31 मध्ये नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुलभूत सुविधा देण्यात कर्मचारी कमी पडत आहेत. त्यामुळे सोमवारी येथील नागरिकांनी शासन नियुक्त नगरसेवक दत्तात्रेय जोत्रे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष जयवंत भाटले यांना निवेदन देत प्रभाग क्रमांक 31मधील …

Read More »

जळालेल्या ऊसाला भरपाई न दिल्यास आंदोलन

राजू पोवार : बेनाडीतील ऊस जळीत क्षेत्राला भेट निपाणी : हेस्कॉमतर्फे निपाणी ग्रामीण भागातील शेतीवाडीमध्ये विद्युत खांब आणि विद्युत वाहिन्या बसविण्यात आले आहेत. पण अनेक गावांमध्ये विद्युत वाहिन्या लोंबकळत असल्याने त्याचा धोका ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होत आहेत. आतापर्यंत अनेक शेतकर्‍यांच्या ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे. पण त्याची जबाबदारी न घेता विज …

Read More »

गरीब विद्यार्थ्यांचे 19.75 लाख रुपये शैक्षणिक शुल्क सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनने भरले!

बेळगाव : बेळगाव शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या एज्युकेशन फॉर नीडी या सेवाभावी शाखेच्या माध्यमातून शहरातील 166 गरीब गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींचे एकूण 19 लाख 75 हजार रुपये इतके शैक्षणिक शुल्क भरण्यात येणार असून आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. आदित्य मिल्क आणि आदित्य आईस्क्रीम कंपनीच्या सहकार्याने हा उपक्रम …

Read More »

कर्नाटक प्रवेशाच्या जाचक अटीमुळे प्रवाशांच्या संख्येत घट

सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक : सीमाभागातील नागरिकांना दिलासा कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी कमी झाली आहे. कर्नाटकी शासनाच्या जाचक अटीमुळे महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात …

Read More »

चोर्ला रस्ता तातडीने दुरुस्त करावा

बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे निवेदन बेळगाव (वार्ता) : गोव्याकडे जाणारा चोर्ला रस्ता अत्यंत खराब झाला असून वाताहत झालेल्या या रस्त्यामुळे बेळगावच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होण्याबरोबरच वाहनचालकांना प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेंव्हा चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जावे, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे …

Read More »

खानापूरात बॅडमिटन स्पर्धा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील बॅडमिंटन असोसिएशन कोर्ट येथे फ्रेंड्स बॅडमिंटन क्लब यांच्यावतीने बॅडमिंटन स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आल्या होत्या. पहिल्या गटात ४० वर्षाखालील तर दुसरा गटात ४० वर्षा गटावरील गटात तर महिलांसाठी ओपन गट अशा विविध गटात स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यास्पर्धेतील विजयी स्पर्धक खालील प्रमाणे मुलीच्या गटात …

Read More »