जॉली राईडचा दुर्दैवी अंत बंगळूर : शहराच्या बाहेरील भागातील होस्कोटे तालुक्यातील एम. सत्त्यवर गावाजवळ आज पहाटे भीषण साखळी अपघात घडून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिवेगात असलेल्या मोटारने नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास महिंद्रा एक्सयूव्ही ७०० मोटारमध्ये शहरातील एका महाविद्यालयातील सहा …
Read More »वैश्यवाणी वधू -वर पालक मेळावा 22 फेब्रुवारी रोजी
बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी वैश्यवाणी वधूवर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशपुर रोड बेळगाव येथील गंगाधरराव शानभाग हॉल (बिस्किट महादेव मंदिर) येथे आयोजित करण्यात आलेला वैश्यवाणी समाजाचा …
Read More »तिर्थकुंडेत मंगळवारी कुस्ती मैदान
बेळगाव : तिर्थकुंडेतील (ता. खानापूर) रामलिंगेश्वर देवस्थान कमिटीतर्फे महाशिवरात्रीनिमित्त मंगळवार दि. १७ दुपारी तीन वाजता निकाली कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती भारत केसरी रोहित लाडपूर वि. शिवगर्जना केसरी शुभम सिदनाळे यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती हरिषकुमार हरियाणा वि. समीय देसाई (पुणे), तिसरी …
Read More »क्रीडाभारती अखिल भारतीय नियामक मंडळ बैठकीला प्रारंभ
बेळगाव : मंडोळी रोड येथील साईराज लॉनच्या सभागृहात अखिल भारतीय क्रीडाभारती नियामक मंडळ बैठकीला शुक्रवार ता. 13 रोजी प्रारंभ झाला. या बैठकीला प्रमुख पाहुणे क्रीडाभारती अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, क्रीडा भारती संघटनमंत्री प्रसाद महानकर, मिलिंद डांगे, रामानंद चौधरी भारती गणपुले, रिना सिंग, कर्नाटक राज्य क्रीडाभारती अध्यक्ष मुकुंद किल्लेकर, …
Read More »परवाना नूतनीकरण रोखल्याने अभियंते आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत मांडल्या व्यथा
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया अचानक थांबवण्यात आल्याने अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सरकारच्या नव्या नियमांमुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आज माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दाद मागण्यात आली. बेळगाव महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आज अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांची भेट …
Read More »माजी खासदारांनी शेतकऱ्यांची माफी न मागितल्यास ‘रयत’चा आंदोलनाचा इशारा
निपाणी (वार्ता) : जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या एका बैठकीचे प्रसंगी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी बँकेतर्फे शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिल्यास तोटा होत असल्याचे म्हटले आहे. शेतकरी हा अन्नदाता असून त्यांच्यासाठीच जिल्हा मध्यवर्ती बँकेची सरकारने निर्मिती केली आहे. त्यामुळे जोल्ले यांनी हा शब्द मागे घेऊन शेतकऱ्यांची माफी न …
Read More »मनरेगाचे नाव बदलण्यास देसूर काँग्रेस कमिटीचा ठाम विरोध
मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली पीडीओना निवेदन देसूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मनरेगा’ (MNREGA) योजनेचे नाव बदलण्याच्या हालचालींचा देसूर काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध केला आहे. युवा नेते मृणाल दादा हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देसूर येथील ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना (PDO) यासंदर्भात एक विशेष निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बोलताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्पष्ट …
Read More »आर्थिक गुंतवणुकीसाठी ‘उमापुत्र चिटफंड’ उपयुक्त
समाधी मठातील प्राणलिंग महास्वामींचा विश्वास निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी जागृत राहून संबंधित संस्थेची चाचणी करून योग्य ठिकाणी आर्थिक पुंजीची गुंतवणूक केली पाहिजे. सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासह चांगला परतावा देण्यासाठी किरणसिंग राजपूत यांनी भविष्यातील आर्थिक गुंतवणूक आणि अधिक लाभाच्यादृष्टीने निपाणी …
Read More »कौटुंबिक वादातून सफाई कामगाराची किल्ले तलावात आत्महत्या
बेळगाव : बेळगावमधील प्रसिद्ध किल्ले तलावात एका सफाई कामगाराने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक कलह आणि दारूच्या व्यसनामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात असून, घटनास्थळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. शहापूर येथील घाडे कॉलनीतील रहिवासी सुभाष हलगेकर (वय ३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुभाष …
Read More »युवा समितीची व्यापक बैठक उद्या
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली असून मराठी भाषा गौरव दिन सोहळा, सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि इतर विषयावर चर्चा करण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta