Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

बीडीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांचा हणबरवाडी ग्रामस्थांच्याकडून सत्कार

कोगनोळी : हणबरवाडी तालुका निपाणी येथील, जय किसान प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघास धान्य विक्री केंद्र मंजूर करून दिल्याबद्दल माजी खासदार व बीडीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांचा चेअरमन मारुती कोळेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सेक्रेटरी सत्याप्पा बन्ने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी …

Read More »

सीमाभागातील मराठी भाषिकांकरिता शिनोळी येथील विद्यालयात प्रवेश सुरू

कोल्हापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांकरिता अपारंपारीक स्वरुपाचे शिक्षण देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभाग, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि लोकविकास केंद्र यांच्या अंतर्गत कौशल्य व उद्योजकता प्रमाणपत्र पत्र अभ्यासक्रम केंद्र शिनोळी येथील वसंत विद्यालय येथे सुरु झाले असून अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नावनोंदणी करावी असे आवाहन शिवाजी विद्यापीठाने केले आहे. …

Read More »

कोल्हापूर वेस व्यापारी मित्र मंडळातर्फे मोफत दंत चिकित्सा शिबीर

निपाणी : येथील कोल्हापूर वेळेस व्यापारी मित्र मंडळ आणि महावीर मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त मोफत दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. मंडळाचे उपाध्यक्ष राजू शिंदे यांनी स्वागत केले. अध्यक्ष प्रथमेश जासूद यांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. चंद्रकांत …

Read More »

कोल्हापूर-बेळगांव मार्गावरील एसटी बस सुरू करा

प्रा. राजन चिकोडे : प्रवाशांचा नाहक त्रास वाचवावा निपाणी : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र शासनाने आंतरराज्य एसटी बस प्रवेशबंदी केली आहे. यामुळे कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील दररोज नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य उपचारासाठी या मार्गावरील प्रवाशांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कागल ते निपाणी या 19 …

Read More »

दुचाकी अपघातात युवक ठार

ममदापूर येथील घटना; दोघेजण गंभीर निपाणी : निपाणी इचलकंजी मार्गावर ममदापूर (केएल) येथील अंबिका देवालयाजवळ दुचाकीला अपघात होऊन युवक ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. अनिकेत सुरेश यादव (रा. ममदापूर, वय 20) असे ठार झालेल्या युवकाचे नाव असून या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. अनिकेत यादव हा संकेत संतोष कदम …

Read More »

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात विविध विकासकामांचा शुभारंभ

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघात बुधवारी विविध विकासकामांना चालना देण्यात आली. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर बेंगळुरूमध्ये विधानसभा अधिवेशनात सहभागी झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधीनी विकासकामांचा शुभारंभ केला. मतदारसंघातील कुद्रेमानी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 11 लाख रुपये निधीतून नूतन इमारत बांधकामाचे भूमीपूजन स्थानिक लोकप्रतिनिधी व युवा काँग्रेस नेते मृणाल …

Read More »

महिला व मुलींना संरक्षण द्या : जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

बेळगाव : महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कडक शासन करण्याबरोबरच बेळगाव शहर परिसरात विविध गुन्ह्यांसह महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्यामुळे प्रशासनाने प्रामुख्याने महिला व मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचार विरोधी समितीने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचार विरोधी समितीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष नियाज …

Read More »

शेतकर्‍यांवर अन्याय झाल्यास आंदोलन

राजू पोवार : ग्रामीण पोलिस ठाण्याला निवेदन निपाणी : कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त परिसरातील जमीन आरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय होणार असून याबाबत चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा …

Read More »

चिमुकली संस्कृती उतरली प्रेक्षकांच्या पसंतीला…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील शिवकन्या संस्कृती सागर खराडे (वय वर्ष-१ वर्ष ३ महिने) यां चिमुकलीचा संस्कारी व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कन्या ही घरची लक्ष्मी समजली जाते. तिच्या जन्मामुळे घर हें उजळून निघत असत. आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला-पुरुष जनन दरामध्ये कोल्हापूर जिल्हा हा अग्रेसर आहे. अश्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये …

Read More »

बेकवाड येथे सजावटीच्या माध्यमातून साकारली पंढरीची वारी

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रायोगौडा कुटुंबीयांनी पंढरीच्या वारीतील डेकोरेशनचा सोहळा साकारला आहे. त्यामध्ये रथात आळंदीहून पंढरपूरकडे येणारी पालखी, वरकरींचे रिंगण, वारकऱ्यांकडून होणारा विठ्ठलाचा जयघोष,   वारकऱ्यांकडून खेळली जाणारी फुगडी, विविध उपक्रम यात साकारलेले आहेत. प्लास्टिक बाहुल्या च्या माध्यमातून वारकऱ्यांच्या मूर्ती साकारल्या आहेत. महिला वारकऱ्यांना साड्या,  पुरुषांना …

Read More »