Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

एम. व्ही. हेरवाडकर स्कुलच्या विजयी विद्यार्थ्यांची रॅली

  बेळगाव : एम. व्ही. हेरवाडकर स्कुलच्या वतीने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मिनी ऑलम्पिक इत्यादी, विजयी विद्यार्थ्यांची रॅली टिळकवाडी विभागामध्ये काढण्यात आली. या वेळी राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कुमारी कल्याणी आंबोळकर (कुस्ती), कुमारी तन्वी कारेकर (स्वीमींग), कुमारी राशी महेश हळभावी (शुटींग), कुमार गीतेश सागेकर बुद्धीबळ (चेस) या …

Read More »

‘बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ द इयर’ स्पर्धा उत्साहात संपन्न!

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित ‘बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ द इयरः २०२५-२६’ ही भव्य चित्रकला स्पर्धा आज (गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५) ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे अत्यंत उत्साहात पार पडली. श्री. बहिर्जी शंभू ओऊळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या स्पर्धेत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत …

Read More »

तालुका स्तरावरील विज्ञान वस्तू प्रदर्शनामध्ये श्री चांगळेशवरी शिक्षण मंडळ संचलित हायस्कूल शिवठाणचा विद्यार्थी पार्थ इसरानी प्रथम

  खानापूर : 17 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या तालुका स्तरावरील विज्ञान वस्तू प्रदर्शनामध्ये श्री चांगळेशवरी शिक्षण मंडळ संचलित हायस्कूल शिवठाणचा विद्यार्थी कुमार पार्थ इसरानी प्रथम आला असून त्याने एक्सीडेंट प्रिव्हेंटेशन मशीन हा प्रयोग सादर केला होता. त्याला शाळेचे मुख्याध्यापक पी. ए. पाटील व विज्ञान शिक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. …

Read More »

श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल हलशी येथे सायन्स ऑन विल्स अँड व्हर्चुअल रियालिटी प्रयोग हा उपक्रम

  खानापूर : गोवा सायन्स सेंटर मीरामार, जिल्हा विज्ञान केंद्र गुलबर्गा आणि ज्ञान प्रबोधन शैक्षणिक साधना केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल हलशी तालुका खानापूर येथे सायन्स ऑन विल्स अँड व्हर्चुअल रियालिटी प्रयोग हा उपक्रम शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी शिवाजी हायस्कूल येथे उत्साहात पार …

Read More »

सीमा तपस्वी रामा शिंदोळकर यांचे निधन

  बेळगाव : सीमा तपस्वी रामा शिंदोळकर यांचे शुक्रवार दि. 21 रोजी रात्री निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामा शिंदोळकर हे अनेक मोर्चे, सत्याग्रह आणि आंदोलनांचे सक्रिय सहभागी होते. बेळगावपुरतेच नव्हे तर कोल्हापूर, मुंबईसह विविध ठिकाणी झालेल्या सीमा आंदोलनातही त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली. आंदोलकांच्या हक्कासाठी त्यांनी …

Read More »

वन्यप्राण्याकडून नुकसानीचा पिक विम्यात समावेश

  कृषी पंडित सुरेश पाटील यांच्या सादरीकरणाला यश ; केंद्र सरकारकडून हिरवा कंदील निपाणी (वार्ता) : ग्रामीण आणि डोंगराळ भागात वन्य प्राण्यांकडून बहुतांश पिकांचे दरवर्षी नुकसान होते. शेतकरी संकटात सापडत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन बुदिहाळ येथील कृषी पंडित सुरेश पाटील यांनी केंद्रीय कृषी विभागाने पंतप्रधान पिक विम्यातील सुधारण्या साठी …

Read More »

भटक्या श्वानांच्या हल्ल्यातील जखमींना पालिकेतर्फे मदतीचे धनादेश

  निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेस असलेल्या बसवनगर परिसरात काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या श्वानांनी अनेकांवर हल्ले करून सुमारे ११ नागरिकांना जखमी केले होते. घटनेनंतर तातडीने उपचार करून पीडितांना मदत मिळावी, यासाठी नगरपालिकेकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.‌ त्यानुसार सर्व जखमी नागरिकांना नगरपालिका माध्यमातून आर्थिक मदत म्हणून बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, नगरसेवक रवींद्र …

Read More »

डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात!

  बेंगळुरू : देशभरात काँग्रेसची कामगिरी समाधानकारक नसतानाच कर्नाटकमध्ये सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती राहणार, यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष चिघळत चालला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या धक्क्यानंतर पक्ष नेतृत्वाचे लक्ष आता सरळ कर्नाटकाकडे वळले असून, दोन्ही गटांनी दिल्ली दरबारात आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. सिद्धरामय्या …

Read More »

काँग्रेस केपीसीसी सदस्यपदी निवडीबद्दल राजेश कदम यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार

  निपाणी (वार्ता) : निपाणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कदम यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष विजय शेटके यांनी स्वागत तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. माजी सभापती किरण कोकरे यांनी, कदम यांनी मिळालेल्या संधीचा …

Read More »

संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूल, लक्ष्मीनगर हिंडलगा- वार्षिक क्रीडा स्पर्धेची उत्साहात सुरुवात

  बेळगाव : संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूल, लक्ष्मीनगर हिंडलगा येथे शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय गोवकर जी, मुख्य अतिथी श्री. पंकज सुरेश रायमाने जी, विशेष अतिथी श्री. अशोक बंडोपंत शिंत्रे जी, अन्य अतिथी श्री. भालचंद्र गाडगीळ जी, तसेच …

Read More »