Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

येळ्ळूर शिवाजी रोड- मारुती गल्ली कॉर्नर येथे विद्युत बोअरवेल मंजूर

  बेळगाव : येळ्ळूर येथील वॉर्ड नंबर 4 व 5 मधील शिवाजी रोड मारुती गल्ली कॉर्नर येथील बोअरवेल गेली कित्येक वर्षे हॅन्डपम्प असल्याने वारंवार बंद पडत होती. यामुळे शिवाजी रोड दुकान मालक व स्थानिक नागरिकांनी वॉर्ड क्रमांक 4 चे विद्यमान सदस्य व ग्रा. पं. माजी अध्यक्ष सतीश बा. पाटील यांना …

Read More »

दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा

  बेळगाव : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात 19 नोव्हेंबर 2025 रोजी कार्तिक अमावस्या अर्थात देव दिवाळीनिमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून विधिवत पूजेला सुरुवात करण्यात आली होती. सकाळी पहाटे रुद्राभिषेक, विशेष आकर्षक पुष्परचना तसेच लोणी पूजनाने धार्मिक विधीचे सुरुवात करण्यात आली. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीग …

Read More »

माध्यम प्रतिनिधींनी अधिस्वीकृतीबाबत परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत

  इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसोबत कोल्हापूर उपसंचालक कार्यालयात चर्चा कोल्हापूर (जिमाका) : स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी,आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान निधी योजना, अधिस्वीकृती पत्रिका अशा अनेक विविध योजना राज्य शासनाने पत्रकारांसाठी राबविलेल्या आहेत.या योजनांचे प्रस्ताव पाठवताना ते परिपूर्णरित्या पाठवावेत, असे आवाहन उपसंचालक प्रवीण टाके यांनी आज केले. कोल्हापूर विभागीय …

Read More »

१० व्यांदा घेतली नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ!

  पटना : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहारमध्ये एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारच्या गांधी …

Read More »

समिती नेत्यांवरील खटल्याची पुढील सुनावणी 27 जानेवारी 2026 रोजी

  बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी काढलेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत म. ए. समिती नेत्यांवर घातलेल्या खटल्यांची सुनावणी गुरुवारी होणार होती. मात्र पुन्हा सदर खटल्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी 27 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी …

Read More »

ऊस तोडण्याच्या यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

  अथणी : अथणी तालुक्यातील सप्तसागर गावात ऊस तोडण्याच्या यंत्रात अडकून एका शेतकरी महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव शोभा श्रीकांत संक्रती (५४) असे आहे. स्वतःच्या शेतात ऊस तोडताना यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू झाला. अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More »

बिडी येथील नेहरू मेमोरियल पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

  खानापूर : खानापूर तालुकास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयांच्या “सांस्कृतिक स्पर्धा” सरकारी प. पू. महाविद्यालय, मुगळीहाळ‌ येथे थाटात पार पडल्या. या स्पर्धेत बिडी येथील नेहरू मेमोरियल पदवीपूर्व महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थी- -विद्यार्थिनी घवघवीत यश संपादन केले असून ते या प्रमाणे…. मोनो ॲक्टिंग कु. दिपा ईटगी प्रथम, तर प्रीया बाबूगौडर हिने द्वितीय क्रमांक मिळविला …

Read More »

कॉम्रेड किशोर ढमाले, प्रा. प्रतिमा परदेशी यांना संयुक्तपणे राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार जाहीर

  बेळगाव : यंदाचा राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार पुणे येथील सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते कॉम्रेड किशोर ढमाले व प्रा. प्रतिमा परदेशी यांना संयुक्तपणे देण्यात येणार आहे. पुरस्कार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. गुरुवार दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी …

Read More »

अपघातात जखमी नागुर्डावाडातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

  खानापूर : जांबोटी-खानापूर मुख्य रस्त्यावर सोमवारी (ता. १७) सकाळी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवम संजय कुंभार (वय १७, रा. नागुर्डावाडा, ता. खानापूर) या तरुणाचा मंगळवारी (ता. १८) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात झाली. दरम्यान, धडक देणारा वाहनचालक पसार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम सोमवारी सकाळी …

Read More »

शहापूरमध्ये जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक

  बेळगाव : शहापूर पोलिसांनी जुने बेळगाव स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई १७ नोव्हेंबरला करण्यात आली. पोलिसांच्या पथकाला येथे अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पथकाची स्थापना करून छापा टाकून कारवाई केली. कारवाईत हमीद इनुशा कागजी (वय ४४, होसूर …

Read More »