मुंबई : बदलापूरच्या अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. या प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. त्यावर पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश …
Read More »पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ
नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या खिशाला चाप लावणारी बातमी समोर येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार आहेत. सोमवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली. जागतिक स्तरावर तेलाच्या किमतींमध्ये चढउतार सुरु आहे. त्यात ट्रम्प प्रशासनाने प्रत्युत्तरात्मक शुल्काची घोषणा केली. या सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. …
Read More »शुभम शेळके यांच्यावरील हद्दपारीची कारवाई रद्द करावी
नामदार हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर कोल्हापूर : महराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर कर्नाटक सरकारने केलेली हद्दपारीची कारवाई रद्द करावी. या मागणीचे निवेदन नामदार हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना आज देण्यात आले. निवेदन देताना विजय देवणे, संजय पवार, प्रकाश …
Read More »गरिबीचा फायदा घेत चार महिन्यांपासून भोंदू बाबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
कोल्हापूर : गरीबी आणि असहाय्यतेचा फायदा घेत अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून गेल्या चार महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात उघडकीस आली. अल्पवयीन मुलीच्या आईने ह्युमन राईट संस्थेकडे मदत मागितल्याने अत्याचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबासह त्याला मदत …
Read More »औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी अयोग्य, पानिपतकार विश्वास पाटील यांचे मत
बेळगाव : औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी योग्य नसल्याचे मत प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि केंद्रीय साहित्य अकादमीचे मराठी भाषा समन्वयक विश्वास पाटील यांनी येथे व्यक्त केले. सपना बुक हाऊस, बेळगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी हे एक अतुलनीय वीर होते, असे मत व्यक्त केले. पूर्वी …
Read More »जत्रेसाठी मावशीकडे आलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू
खानापूर : मावशीच्या गावी जत्रेला आलेल्या युवकाचा तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देमिनकोपमध्ये (ता. खानापूर) रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. तरुण चलवादी (वय २१, रा. कंचनोळी, ता. हल्ल्याळ) येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, कोडचवाड येथील श्री कलमेश्वर देवाची यात्रा आज मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, …
Read More »बेळगाव इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनची स्थापना
बेळगाव : “बातम्या समाजाची शांतता बिघडवू नयेत, तर आरोग्यपूर्ण समाज घडवणाऱ्या असाव्यात, माध्यम हा समाजाचा चौथा स्तंभ म्हणून गौरवोद्गार करत प्रसार माध्यमामुळे बेळगावातील घडामोडी दिल्लीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे माध्यमांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे.” असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. बेळगावात जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात …
Read More »धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा शिवप्रेमींसाठी अभिमान : प्रकाश शिरोळकर
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यासाठी माजी आमदार कै संभाजी पाटील व मराठी भाषिकांनी परिश्रम घेतले असून पुतळा उभारणीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत याचा संपूर्ण शिवप्रेमीना अभिमान आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केले आहे. राम नवमीचे औचित्त साधून साहेब फाउंडेशन आणि …
Read More »वीर सौध योगा केंद्रातर्फे रामनवमी उत्सवात साजरी
बेळगाव : टिळकवाडी वीर सौध योगा केंद्रातर्फे श्री राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी श्रीराम प्रतिमेचे विधिवत मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. योगा प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांनी प्रास्ताविक करुन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. रामायणचा विचार करताना, त्यांच्या जीवनात चढ उतार, भावनिक हेलकावे, सामर्थ्यवान म्हणून …
Read More »विवाहित महिलेचा पाठलाग करून मानसिक छळ; इदलहोंड येथील प्रकार
खानापूर : एका विवाहित महिलेचा पाठलाग करून मानसिक त्रास देणाऱ्या व्यक्तीने सदर महिलेवर व तिच्या पतीवर आज अचानक वीटभट्टीवर काम करत असताना हल्ला चढवून महिलेच्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार इदलहोंड येथे घडला. मिळालेल्या माहितीनुसार, काजल मल्लप्पा पुजारी (मूळ रचाकट्टी, हुक्केरी) ही विवाहित महिला काही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta