Thursday , September 19 2024
Breaking News

Belgaum Varta

राज्यपालांच्या निर्णयाविरुध्द मुख्यमंत्र्यांची आज आव्हान याचिका

  कायदेतज्ञांशी चर्चा; कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी बंगळूरात दाखल बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जमीन वाटप प्रकरणी खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज (ता. १९) न्यायालयात जाणार आहेत. राज्यपालांच्या आदेशावर स्थगिती देण्याची विनंती करून आदेश फेटाळून लावण्यासाठी ते उच्च न्यायालयात याचिका दाखल करतील. …

Read More »

राष्ट्रीय आपत्ती निवारणार्थ “जायंट्स” सदैव अग्रेसर : एम. लक्ष्मणन

  बेळगाव : “देशावर ज्या ज्या वेळी राष्ट्रीय आपत्ती आल्या त्या त्यावेळी जायंट्स ग्रुप त्या आपत्ती निवारणार्थ धावून गेलेला आहे. जायंट्स ही स्वदेशी चळवळ असून ती अजून वाढण्याची गरज आहे” असे प्रतिपादन जायंट्स इंटरनॅशनलचे डेप्युटी वर्ल्ड चेअरमन एम. लक्ष्मणन यांनी बोलताना व्यक्त केले. जायंट्स ग्रुप ऑफ ब्रम्हावरच्या वतीने रविवारी ब्रह्मावर …

Read More »

उच्चदाबाच्या विद्युत तारा हटविल्या; बाल गणेश मंडळाच्या मागणीला यश

  बेळगाव : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकर गल्ली, शहापूरच्या बाल गणेश उत्सव मंडळाने अलीकडेच एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्या केल्या होत्या. तेंव्हा त्यांनी केलेल्या मागण्यांचे लवकरात लवकर पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची अंमलबजावणी सुरू झाली असून आज रविवारी गल्ली परिसरातील धोकादायक उच्चदाबाच्या विद्युत तारा हटविण्यात आल्या. येत्या श्री …

Read More »

डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपावा : खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

  निपाणीत डॉ. आंबेडकर शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशातील राजकारण आणि समाजकारणात शाहू, फुले आंबेडकरांचे मोठे कार्य झाले आहे. डॉ. आंबेडकर हे संविधान ज्ञानक होते. शाहू महाराजांनी केलेले कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा जपणे आवश्यक आहे, असे मत कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज …

Read More »

मराठा समाजाच्या हितोन्नतीसाठी उत्तरमध्ये झाली चिंतन बैठक : युवा नेते किरण जाधव यांनी केले मार्गदर्शन

  बेळगाव : मराठा संजबांधवांच्या हितोन्नतीसाठी संघटीत प्रयत्न करणे आज काळाची गरज आहे, असे मत मराठा समाजातील युवा नेते किरण किरण जाधव यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षण गणना 3 ब मधून 2 अ मध्ये व्हावी यासह समाज बांधवांच्या हितोन्नतीसाठी च्या अनुषंगाने असणाऱ्या मागण्यांमध्ये एकवाक्यता असावी, यासाठी शनिवारी सायंकाळी 5 वाजता …

Read More »

एम. टी. पाटील यांना विविध संस्थातर्फे शोकसभेत श्रद्धांजली

  बेळगाव : बेळगावातील शिक्षण व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत एम. टी. पाटील यांना शनिवारी झालेल्या शोकसभेत विविध संस्थांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाटील यांनी विविध क्षेत्रात निष्ठेने भरीव कार्य केले आहे. त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे यावेळी केलेल्या शोकप्रस्तावात म्हटले आहे. आदर्श को- ऑप. …

Read More »

21 ऑगस्टला भारत बंदची हाक

  नवी दिल्ली : सर्व अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या निषेधार्थ बुधवार दि. 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात बुधवारी देशभरात दलित आंदोलन करणार आहेत. सर्व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायाच्या अधिकाऱ्यांनी जगदलपूरच्या सर्व प्राधिकरणांना आणि विविध संघटनांना पत्राद्वारे कळवले …

Read More »

बस आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

  गदग : गदग जिल्ह्यातील नरगुंद तालुक्यातील कोन्नूर येथे परिवहन मंडळाची बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात हावेरी येथील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. रुद्रप्पा अंगडी (55), पत्नी राजेश्वरी (45), मुलगी ऐश्वर्या (16) आणि मुलगा विजय (12) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब कल्लापुर बसवेश्वर …

Read More »

इस्कॉनमध्ये उद्यापासून विविध कार्यक्रम

  बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत् संघ (इस्कॉन) च्या वतीने जन्माष्टमीच्या निमित्ताने 19 ते 27 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ला बलराम जयंती 19 ऑगस्ट रोजी इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलांनंद मंदिरात श्री बलराम जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Read More »

स्वप्नील कुसाळेचे जिल्ह्यात जोरदार स्वागत होण्यासाठी चोख नियोजन करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

  ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेची बुधवारी कोल्हापुरात भव्य मिरवणूक कोल्हापूर : ऑलिंपिकमध्ये देशाचे नाव उंचावणारा कोल्हापूर जिल्ह्याचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत होण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. पॅरीस येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये कांस्य पदक प्राप्त झाल्यानंतर …

Read More »