Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

हुबळी-दादर-हुबळी एक्स्प्रेसला सोमवारपासून खानापूर येथे एक मिनिटाचा थांबा

  हुबळी : प्रवाशांच्या सोयीसाठी, दक्षिण पश्चिम रेल्वेने १५.०९.२०२५ पासून खानापूर (केएनपी) रेल्वे स्थानकावर ट्रेन क्रमांक १७३१७/१७३१८ एसएसएस हुबळी-दादर-एसएसएस हुबळी एक्सप्रेस गाड्यांना एक मिनिट थांबा दिला आहे. ट्रेन क्रमांक १७३१७ (एसएसएस हुबळी-दादर) १७:५९ वाजता खानापूरला पोहोचेल आणि १८:०० वाजता निघेल. त्याचप्रमाणे, १६.०९.२०२५ रोजी, ट्रेन क्रमांक १७३१८ (दादर-एसएसएस हुबळी) खानापूर येथे …

Read More »

महात्मा गांधी रुग्णालयामधील डायलिसिस मशीन धूळखात!

  निपाणी : येथील महात्मा गांधी रुग्णालयामध्ये किडणी आजार रुग्णांच्या सोयीसाठी डायलिसिसची नवीन ६ मशीन आलेली आहेत. अनेक महिने जोडणीच्या नावाखाली मशीन तशीच पडून आहेत. त्यामुळे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती डायलिसिस रुग्णांची झाली आहे. तरी आरोग्य विभागाने त्याकडे लक्ष देऊन तत्काळ मशीन जोडण्याची मागणी डायलिसिस रुग्णांतून होत आहे. …

Read More »

गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसला; ९ जणांचा मृत्यू

  हासन : गणपती विसर्जन मिरवणुकीत भरधाव वेगाने आलेला ट्रक घुसल्यामुळे भीषण अपघात होऊन ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात घडली आहे. गुरूवारी सायंकाळी हा अपघात घडला. त्यानंतर शुक्रवारी आरोपी चालकाला अटक करण्यात आली. पोलीस महानिरीक्षक बोरलिंगय्या यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, गुरूवारी रात्री ८ ते …

Read More »

राज्यात २२ सप्टेंबरपासून जातीय जनगणना : मुख्यमंत्र्यांची घोषणा

  डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना बंगळूर : कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाकडून २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. गृह कार्यालय कृष्णा येथे पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, आम्ही जातीय जनगणनेचे पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जात …

Read More »

बेळगावमध्ये वस्त्रोद्योग संशोधन केंद्र सुरू करणार

  मंत्री शिवानंद पाटील; दोन लाख रोजगार निर्मितीला चालना देणार बंगळूर : वस्त्रोद्योग आणि तयार वस्त्रोद्योग क्षेत्रात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि सुमारे २ लाख रोजगार निर्माण करण्यासाठी वस्त्रोद्योग धोरण २०२५-३० तयार केले जाईल, असे वस्त्रोद्योग, ऊस विकास, साखर आणि कृषी पणन मंत्री शिवानंद पाटील म्हणाले. बेळगावमध्ये वस्त्रोद्योग संशोधन केंद्र …

Read More »

सेंट्रल बस स्थानकावर दागिने चोरणारी महिला अटकेत

  बेळगाव : बेळगाव शहरातील सेंट्रल बस स्टॅन्ड मधील प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला अटक करण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे. मोनीषा मनीगंडण (वय 28) रा. तिरुपट्टूर, जोलरपट्टी वेल्लोर तमिळनाडू असे या अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार 18 फेब्रुवारी 2024 रोजी निपाणीच्या ज्योती पाटील या …

Read More »

सीमाप्रश्नी ठोस निर्णय घ्या : समिती नेते रामचंद्र मोदगेकर यांची निवेदनाद्वारे खा. धैर्यशील माने यांच्याकडे मागणी

  बेळगाव : मुंबई येथील मंत्रालयामध्ये सीमा कक्षाच्या सभागृहात तज्ञ समितीची विशेष बैठक 10 सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीप्रसंगी सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निवेदन देत सीमाप्रश्नी ठोस निर्णय घ्यावा अशी विनंती केली. यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्य, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र …

Read More »

‘मानस कराटे ॲकॅडमी’चे कोलकात्ता राष्ट्रीय स्पर्धेत यश

  बेळगाव : बेळगावच्या ‘मानस कराटे स्पोर्ट्स ॲकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत बेळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. पश्चिम बंगालमधील कोलकात्ता येथे ‘जे.एस.एस.के.’ संस्थेतर्फे आयोजित ‘ओपन नॅशनल कराटे’ स्पर्धेत देशभरातील ६०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रासह, नेपाळ, ओडिशा, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ …

Read More »

देवस्थानाच्या मूळ ढाच्याला धक्का लागता कामा नये : सह पालकमंत्री माधुरी मिसाळ

  कोल्हापूर (जिमाका) : येथील महालक्ष्मी तसेच जोतिबा मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणचे आधुनिकीकरण करत असताना देवस्थानच्या मूळ ढाच्याला धक्का लागणार नाही याची संबंधित एजन्सीने दक्षता घ्यावी, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात देवस्थान (तिर्थक्षेत्र) विकास आराखड्याच्या …

Read More »

शैक्षणिक विकासासाठी सदैव कटिबद्ध : आमदार विठ्ठल हलगेकर

  खानापुरात सरकारी विद्यालयात इमारतीचे भूमिपूजन! खानापूर : खानापूर तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी आमचा नेहमी प्रयत्न असणार आहे. मागील सरकारच्या काळात खानापूर तालुक्यातील दोन सरकारी विद्यालयाच्या विकासासाठी तत्कालीन शैक्षणिक मंत्री सुधाकर यांच्याकडे आम्ही अर्ज विनंती केली होती. त्यानंतर देखील विद्यमान सरकारकडे आपण या दोन महाविद्यालयांच्या इमारत विकासासाठी निधीचा प्रस्ताव केला होता …

Read More »