निपाणी : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात मूक फेरीत सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून गेलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी नाक्यावर रोखले. यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरु केले, यामुळे तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब …
Read More »कन्नड राज्योत्सवाच्या पथसंचलनावेळी पालकमंत्र्यांच्या वाहनातून डिझेल गळती
बेळगाव : आज बेळगावमध्ये कर्नाटक राज्योत्सव जिल्हा स्तरावर साजरा होत असताना पथसंचलन सुरू होते. याच दरम्यान पालकमंत्री सतीश जारकीहोळी ज्या वाहनातून संचलन पाहण्यासाठी जात होते, त्या जीपमधून डिझेल गळती सुरू झाली. तातडीने तेथे उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी फायर कंट्रोल गॅसची फवारणी करून पुढील मोठा अनर्थ टाळला. बेळगावमध्ये सुरू …
Read More »….म्हणे समिती भाडोत्री कार्यकर्त्यांना जमवून काळा दिन पाळते; आमदार लक्ष्मण सवदी यांचे वादग्रस्त वक्तव्य
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीवर आमदार लक्ष्मण सवदी यांनी तोंडसुख घेत महाराष्ट्र एकीकरण समितीने जर बेळगाव मागितल्यास आपण मुंबई मागू असे बेताल वक्तव्य करून मराठी भाषिकांचा रोष ओढवून घेतला आहे. शनिवारी अथणी येथे माध्यमांशी बोलताना आम. लक्ष्मण सवदी म्हणाले, म. ए. समितीने बेळगावची मागणी बंद करावी. जर त्यांनी हि …
Read More »खासदार धैर्यशील माने यांना कोगनोळी टोलनाक्यावर अडवले; महामार्गावर ठिय्या आंदोलन
निपाणी : बेळगाव सीमाभागात ‘काळा दिवस’ पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आज (दि. १ नोव्हेंबर) तज्ञ समितीचे अध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने बेळगावकडे रवाना झाले होते. मात्र, कर्नाटक पोलिस प्रशासनाने त्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावरच अडवले, त्यामुळे काही काळ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा तणाव निर्माण …
Read More »बेळवट्टी उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय
बेळगाव : बेळवट्टी ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष बाबूराव पाटील यांच्या विरोधात ग्रामपंचायतीतील सदस्यांनी अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी यासंदर्भातील निवेदन प्रांताधिकारी आणि तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे, बाबूराव पाटील यांनी जुलै २०२४ मध्ये उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी सदस्यांना विश्वासात …
Read More »बोरगावमधील किल्ला स्पर्धेत राजे ग्रुप विजेता
नगरसेवक शरद जंगटे फाउंडेशनतर्फे आयोजन; स्पर्धेला बालचमूसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील जंगटे फाउंडेशनतर्फे यंदाच्या दिवाळी निमित्त शरद जंगटे यांनी किल्ला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये बोरगाव आणि उपनगरातील बालचमू आणि युवकांनी नानाविध प्रकारचे आकर्षक गड किल्ले साकारले होते. त्यामध्ये निकम गल्लीतील राजे ग्रुपने प्रथम क्रमांक …
Read More »पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या नव्या वर्गाच्या बांधकामाची कॉलम भरणी
बेळगाव : शहापूर येथील विश्व भारत सेवा समितीच्या पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या नव्या वर्गाच्या बांधकामाच्या कॉलम भरणीचा कार्यक्रम आज शुक्रवारी पार पडला. पत्रकार श्रीकांत काकतीकर यांच्या हस्ते कॉलम भरणे आणि पूजा करण्यात आली. सदर कामासंदर्भात माहिती देताना विश्व भारत सेवा समिती संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी म्हणाले, दिवंगत केंद्रीय …
Read More »समीक्षा भोसले हिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची बुद्धिबळपटू समिक्षा भोसले हिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच सौंदत्ती मुन्नवळी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत समिक्षा भोसले हिने 4 गुणास आपली निवड सार्थ ठरविली आहे,आता यादगिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. शाळेचे अध्यक्ष …
Read More »भाविपच्या राज्यस्तरीय समूहगीत स्पर्धेत बेळगावच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलला प्रथम क्रमांक
बेळगाव : भारत विकास परिषदेच्या रायचूर येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत बेळगावच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे आता त्यांची पुढील आठवड्यात तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या दक्षिण भारत विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. बेळगाव शाखेअंतर्गत झालेल्या समूहगीत स्पर्धेत सहभागी 21 शाळांमधून प्रथम क्रमांक प्राप्त …
Read More »निपाणीमधील कुत्र्यांच्या हल्ल्यातील रुग्णांना बोरगाव अरिहंततर्फे मदतीचा धनादेश
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बसवाणनगर मधील नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला झालेला होता. त्यामध्ये सात जणांचा चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले होते. अशा रुग्णांना बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्थिक सहाय्य करण्यात आले. नगरसेवक शौकत मनेर, दत्ता नाईक, संजय पावले, माजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta