Thursday , September 19 2024
Breaking News

Belgaum Varta

डीजेच्या तालावर नाचत असताना विजेचा धक्का लागून ९ जणांचा जागीच मृत्यू

  पटणा : कावड यात्रेत डीजेच्या तालावर नाचत असताना विजेचा धक्का लागून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. ही दुर्देवी घटना बिहारच्या वैशालीनगर जिल्ह्यात रविवारी (ता. ४) रात्रीच्या सुमारास घडली. मृतांमध्ये रवी कुमार, राजा कुमार, नवीन कुमार, अमरेश कुमार, अशोक कुमार, कालू कुमार, आशू कुमार, चंदन …

Read More »

पत्नीने प्रियकराच्या मदतीने हातपाय बांधून विष पाजलेल्या “त्या” जवानाचा अखेर मृत्यू

  कोल्हापूर : पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हातपाय बांधून विष पाजण्यात आलेल्या सैन्य दलातील जवान अमर भीमगोंडा देसाई (रा. नूल, ता. गडहिंग्लज) यांचा पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी देसाई यांची पत्नी तेजस्विनी व प्रियकर सचिन राऊत यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा यापूर्वी दाखल …

Read More »

निःपक्षपातीपणे सर्वे करून भरपाई द्यावी

  रयत संघटनेची मागणी; खासदार जगदीश शेट्टर यांची भेट निपाणी (वार्ता) : जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे बेळगावसह निपाणी, चिकोडी परिसरातील झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक घरांची पडझड झाली आहे. पाऊस कमी झाला असून पूर परिस्थिती आहे. नद्यांची पाणीपातळी कमी झाल्यानंतर नुकसानीचा नि:पक्षपातीपणे सर्वे करून संबंधितांना …

Read More »

विद्यार्थी व पालकांत सुसंवाद असणे गरजेचे : प्राध्यापक डॉ. उदय पाटील

  मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा बेळगाव : विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेने निर्णय घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांत सुसंवाद असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. उदय पाटील यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या …

Read More »

दारूच्या नशेत मुलाकडून आईची हत्या

  बैलहोंगल : दारूच्या नशेत मुलाने आईची हत्या केल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील उडीकेरी गावात घडली. महादेवी गुरप्पा तोलगी (७०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा इराण्णा गुराप्पा तोलगी (वय ३४) याने तिचा दारूच्या नशेत खून केला त्याच्या नावावर शेती करावी तसेच पैशासाठी तो कायम आपल्या आईला त्रास देत …

Read More »

येळ्ळूर लक्ष्मी चौकाच्या सुशोभिकरणाला सुरुवात; नागरिकांतून समाधान व्यक्त

  पेव्हर्स बसविण्याचे काम सुरु येळ्ळूर : येळ्ळूर गावातील एक मुख्य चौक असलेल्या लक्ष्मी चौकाचे सुशोभीकरण बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या सहकार्यातून होत आहे, आमदार अभय पाटील यांनी या चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी स्पेशल फंड मंजूर केला असून, त्यांच्या सहकार्यातूनच लक्ष्मी चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले आहे. संपूर्ण चौकात पेव्हर्स …

Read More »

यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत

  मुंबई : यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नेमके कोणत्या ठिकाणी होणार, याची अनेकांना उत्सुकता लागून होती. याबाबत अनेक चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून 98 वे साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 70 वर्षांनंतर राजधानी दिल्लीत मराठी भाषेचा आवाज …

Read More »

अलतगा येथील दुर्घटनेतील “त्या’ युवकाचा मृतदेह सापडला

  बेळगाव : अलतगाहून कंग्राळी (खुर्द)कडे कटिंग करायला दुचाकीवरून जात असताना दुचाकी नाल्यात कोसळून झालेल्या अपघातानंतर नाल्याच्या पाण्यातून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शोधून काढण्यात एसडीआरएफ टीमला यश आले आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास “त्या” युवकाचा मृतदेह सापडला. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अलतगा युवक ओंकार पाटील हा वाहून गेला होता रविवारी …

Read More »

मध्यप्रदेशमध्ये मंदिराची भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू

  रिवा : श्रावणमासानिमित्त शाहपूरच्या हरदोलमध्ये शिवलिंग निर्माण आणि भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी शिवलिंग बनविण्याचे काम सुरु होते. शिवलिंग बनविण्यासाठी १० ते १५ वर्षांची मुले या कार्यक्रमाला गेली होती. यावेळी शेजारील भिंत या मुलांवर कोसळून ९ मुलांचा मृत्यू, तर दोघेजण जखमी झाले आहेत. अनेकजण जखमी झाले आहेत. …

Read More »

येत्या ७२ तासांत मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

  बंगळुरू : यंदा पावसाने भीषण पूरस्थिती निर्माण केली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी हवामान खात्याने पुढील ७२ तास ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाळा संपायला अजून २ महिने बाकी आहेत. म्हणजेच सप्टेंबर २०२४ पर्यंत मान्सून पाऊस पडेल. असे असले तरी अवघ्या २ महिन्यात पावसाच्या …

Read More »