राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार सुरवात बंगळूर : कर्नाटक विधीमंडळाचे उद्या (ता.१४) पासून सुरू होणारे संयुक्त अधिवेशन सध्या सुरू असलेल्या हिजाब विवाद आणि संबंधित कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, कंत्राटदार संघटनेचे लाचखोरीचे आरोप आणि मेकेदाटू प्रकल्प अंमलबजावणीच्या मुद्द्यांमुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार्या १० दिवसांच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्या (ता.१४) राज्यपाल …
Read More »राज्यातील हायस्कुल उद्यापासून सुरु : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
बेंगळुरू : राज्यातील हायस्कुल उद्यापासून सुरु करण्यात येणार आहेत. शाळा व्यवस्थापन समित्यांशी चर्चा करून कसलाही गोंधळ होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हुबळी येथे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, हायस्कुलचे वर्ग उद्यापासून भरविण्यात येणार आहेत. गोंधळ होऊ शकेल अशा शाळांबाबत शांतता …
Read More »बेकवाडात रविवारी हरिनाम सप्ताहाची महाप्रसादाने सांगता
खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही ४१ वा हरिनाम सप्ताहाची सांगता रविवारी दि. १३ रोजी महाप्रसादाने झाली. शुक्रवारी दि. ११ रोजी हभप शटवाप्पा पवार यांच्याहस्ते पोतीस्थापना होऊन सोहळ्याला प्रारंभ झाला. सायंकाळी प्रवचन, हरिजागर आदी कार्यक्रम झाले. शनिवारी दि. १२ रोजी पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, गाथा भजन, …
Read More »चालत्या आयशरला आग
कोगनोळी फाट्यावरील घटना कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर चालत्या आयशरला आग लागल्याची घटना रविवार तारीख 13 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातहून बेंगलोरला जात असलेल्या आयशर ट्रकला कोगनोळीजवळ असणाऱ्या दुधगंगा नदीजवळ अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी …
Read More »सागरे, दोडेबैल गावच्या लक्ष्मी यात्रेनिमित्त जादा बस सेवेची सोय करा
बसडेपोला युवा समितीचे निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील सागरे, दोडेबैल गावच्या ग्रामदेवता लक्ष्मी देवीची यात्रा गेल्या कित्येक वर्षानंतर येत्या बुधवार दि. १६ पासून मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या लक्ष्मीयात्रेला कर्नाटक राज्यासह महाराष्ट्र, गोवा राज्यातुन भाविक मोठ्या संख्येने येतात. तेव्हा सागरे, दोडेबैल गावच्या लक्ष्मीयात्रेनिमित्त खानापूर ते सागरे, दोडेबैल गावाला …
Read More »तहसीलदार व क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना खानापूर म. ए. समितीच्यावतीने निवेदन देणार
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची मासिक बैठक शनिवार दिनांक १२-२-२०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव यशवंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी खानापूर तालुका म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते कै. पांडुरंग लक्ष्मण काकतकर नंदगड, कै. स्वरसम्राज्ञी कीर्ती जयराम शिलेदार …
Read More »संकेश्वर यात्रेत सोन्याची चेन हिसकावून चोरटे फरार…
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेत युवानेते प्रकाश नेसरी यांच्या गळ्यातील ४८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरांनी हिसकावून फरार झाल्याची घटना घडली आहे. चोरी झालेल्या सोन्याच्या चेनची किंमत अदमासे २ लाख १९ हजार रुपये आहे. चोरीचा प्रकार यात्रेत उपस्थित लोकांच्या डोळ्यांदेखत घडला तरी चोरटे चलाखीने निसटले आहेत. याविषयी …
Read More »कर्नाटक प्रवेश आरटीपीसीआर सक्ती रद्द
पोलिस बंदोबस्त कायम कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती कर्नाटक शासनाने रद्द केली असून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आता फक्त कोरोना दोन डोस घेतलेला दाखला दाखवून प्रवेश मिळणार आहे. कर्नाटक शासनाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र व कर्नाटकातील सीमा …
Read More »शेतकऱ्यांबरोबर चर्चेसाठी अधिकारीच गैरहजर
रयत संघटना आक्रमक: आंदोलन छेडण्याचा इशारा निपाणी (वार्ता) : रयत संघटनेच्या माध्यमातून कोगनोळी टोल नाका येथील पिडित शेतकरी बंधू व किरकोळ विक्रेते यांनी अधिकाऱ्यांना सर्वे बंद करण्यास भाग पाडले होते. सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चर्चा केल्याशिवाय पुढील निर्णय घेतला जाणार नाही असे ठरले होते. परंतु अचानक सर्व शेतकऱ्यांना नोटीस देऊन …
Read More »खानापूर तालुक्यातील गोमारी तलाव शेतकरी वर्गाला वरदान
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मंग्यानकोप ग्राम पंचायतीच्या हद्दीतील शिवाजी नगरात गोमारी तलाव गेल्या ७० वर्षापूर्वी उभारण्यात आला. गोमारी तलाव तालुक्यात आकाराने मोठा आहे. शिवाय गोमारी तलावाची प्रसिद्धी मोठी आहे या तलावला जोडलेल्या गस्टोळी कॅनल नुकताच कोसळला. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या शेतीला होणार पाणी पुरवठा बंद झाला आहे. गोमारी तलाव हा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta