Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

  बेळगाव : सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथे सन 2025-26 सालातील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्षा सौ.दिव्या संदिप कुंडेकर या होत्या, प्रमुख वक्त्या शाळेच्या माजी विद्यार्थीनी आणि निर्देशक, कौशल्य अभिवृद्धी केंद्र आणि अध्यक्षा महिला घटक व्हीटीयू डॉ. संध्या राजन अणवेकर त्याचबरोबर बेळगाव ग्रामीणचे …

Read More »

डॉक्टर दांपत्याकडून 37 जणांची फसवणूक; खडेबाजार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

  बेळगाव : एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे त्याचप्रमाणे रशियामध्ये नोकरीचे आमिष दाखवून यमनापूर येथील डॉक्टर दांपत्याने बेळगाव शहरातील जवळपास 37 जणांची फसवणूक करून 75 लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, डॉक्टर सुरज अशोक अनगोळकर हे …

Read More »

आयुष्यात एक दिवस अविस्मरणीय असावा यासाठीच वाढदिवस ज्येष्ठांसोबत साजरा : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : ज्येष्ठ नागरिकांसमवेत वाढदिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे वडीलधाऱ्या मंडळींसोबत वेळ घालवणे व त्यांचा आशीर्वाद घेणे हा होता. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नवचैतन्य, उत्साह निर्माण व्हावा अशी आपली इच्छा होती. दैनंदिन जीवनातील समस्या दूर ठेवून त्यांच्या आयुष्यात एक दिवस अविस्मरणीय असावा यासाठी आपण आपला वाढदिवस ज्येष्ठांसोबत …

Read More »

व्यसनमुक्ती काळाची गरज, युवा पिढीने आत्मचिंतन करावे : निवृत्त शिक्षक गोविंद कालसेकर

  समाज सारथी सेवा संघाच्या बैठकीत चिंतन येळ्ळूर : दिवसेंदिवस युवापिढी व्यसनाधिन होत असुन अनेकांचे जीवन बरबाद होते आहे. त्याचा त्रास जन्मदाता आईवडिलांना होतो याच भान ठेवत युवकानी आत्मचिंतन करावे, असा सल्ला संघटनेचे हिशोब तपासणीस गोविंद काळसेकर यानी दिला. ते समाज सारथी सेवा संघाच्या बैठकीत बोलत होते अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष …

Read More »

‘मराठी सन्मान यात्रे’ला येळ्ळूर म. ए. समितीचा पाठिंबा

  येळ्ळूर : 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी सन्मान यात्रेत बहुसंख्येने हजर राहून यशस्वी करण्याचा निर्धार येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. गोविंद बापूसाहेब पाटील हे होते. …

Read More »

जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशनचा 9 वा वर्धापनदिन व हळदीकुंकू समारंभ संपन्न

  बेळगाव : जय जन कल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित मण्णूर संचलित जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन, मण्णूर या संस्थेचा 9 वा वर्धापनदिन व हळदी कुंकू समारंभ अनन्य फार्म हाऊस येथे पार पडला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संस्थापक सहकाररत्न एल के कालकुंद्री सर व चेअरमन लक्ष्मण मंडोळकर तसेच …

Read More »

वडगाव परिसरात प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा सुरू

  बेळगाव : बेळगाव शहरात 24/7 पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 24 तास पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण मतदार संघातील वडगाव परिसरात गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी पासून प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने या भागातील पाणीपुरवठा योजनेला चालना देण्यात येणार आहे. यासंदर्भात बेळगाव …

Read More »

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, उपाध्यक्ष के एल मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील व डॉ. नागभूषण चौगुले हे उपस्थित होते. यावेळी …

Read More »

युवा समिती बेळगावच्या वतीने १ मार्च २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज शनिवार १४ रोजी युवा समिती कार्यालयात अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत १ मार्च २०२६ रोजी मराठा मंदिर येथे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षिस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण आणि मराठी भाषा गौरव …

Read More »

श्री गुरुदेव रानडे मंदिरच्या शताब्दी महोत्सवानिमित्त “स्वरसंध्या” संगीत मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध

  बेळगाव : हिंदवाडी येथील विख्यात श्री गुरुदेव रानडे मंदिरच्या अकॅडमी ऑफ कॉम्परेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजनला 100 वर्षे पूर्तीनिमित्त शताब्दी महोत्सवांतर्गत गुरूवारी सायंकाळी मंदिरच्या दिव्य सभागृहात आयोजित भक्तीरसपूर्ण “स्वरसंध्या” कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. गायक विनायक मोरे, ऋषिकेश हेर्लेकर, योगेश रामदास, गायिका सुलक्षणा देसाई, अक्षता मोरे यांनी एकाहून एक …

Read More »