Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

१ नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा; खानापूर समितीच्या वतीने नंदगड भागात जनजागृती

  खानापूर : एक नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांत रचना करतेवेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हा मराठी बहूभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला असून, गेल्या ६८ वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून निषेध व्यक्त करतात. येत्या शनिवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी आपले …

Read More »

निळ्या ‘पीक कॅप’मध्ये झळकणार कॉन्स्टेबल; आजपासून राज्य पोलिसांचा नवा लूक

  पारंपारिक स्लॉच हॅटला निरोप बंगळूर : कर्नाटक पोलिस दलाचा गणवेश आजपासून अधिक आधुनिक आणि आकर्षक दिसणार आहे. पारंपारिक ‘स्लॉच हॅट’ला निरोप देत, राज्यातील पोलिस कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल आता निळ्या रंगाच्या ‘पीक कॅप’मध्ये झळकणार आहेत. हा ऐतिहासिक बदल मंगळवारी विधानसौधाच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात झाला. या समारंभात मुख्यमंत्री …

Read More »

नेत्र शस्त्रक्रिया विभागात सर्जन पदवी मिळविल्याने डॉ. प्रियांका जासूद यांचा निपाणीत सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांची कन्या डॉ.प्रियांका सागर पाटील यांनी नेत्र शस्त्रक्रिया विभागात सर्जन पदवी प्राप्त केली आहे. शिवाय अपघातातील मृत व्यक्तीच्या नेत्राचे दुसऱ्या व्यक्तीला यशस्वीरीत्या प्रत्यार्पण केले. या अवघड शस्त्रक्रियेमुळे त्यांचा येथील माजी नगरसेवक संघटनेतर्फे माजी नगराध्यक्ष विजय शेटके, प्रवीण भाटले सडोलकर यांच्या हस्ते …

Read More »

संगोळी रायण्णा पुतळा उभारणीत सर्वधर्मीयांचे योगदान महत्त्वाचे

  बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे : विविध समाजातील प्रमुखांची बैठक निपाणी (वार्ता) : क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सर्कलचे सुशोभीकरण करून तेथे पूर्णाकृती पुतळा बसण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. गेल्या दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केल्याने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्कलच्या सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातून ३.२५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. चबुत-यावर पुतळा …

Read More »

काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा; खानापूर समितीच्या वतीने जांबोटीत जनजागृती

  जांबोटी : 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांत रचना करतेवेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर मराठी बहूभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला असून, गेल्या 68 वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून निषेध व्यक्त करतात. येत्या शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी आपले दैनंदिन …

Read More »

ऊसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये दिल्याशिवाय ऊस तोड देऊ नये

  राजू पोवार ; निपाणीत रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : यावर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर जाहीर दिल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसतोड देऊ नये. …

Read More »

बोरगावात कापड दुकानासह तीन ठिकाणी चोरी

  लॅपटॉपसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास ; व्यवसायिकातून भीतीचे वातावरण निपाणी(वार्ता) बोरगाव येथे रविवारी (ता.२) रात्री चोरट्यांनी कापड दुकानासह तीन ठिकाणी चोरी करून लॅपटॉपसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे बोरगावसह परिसरातील व्यापारी वर्गासह नागरिकांतून भेटीचे वातावरण व्यक्त होत आहे. शिवाय पोलिस प्रशासनाविरोधात नाराजी पसरली आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक …

Read More »

बोरगाव उरुसात भाविकांची गैरसोय होऊ देऊ नका

  Ø उत्तम पाटील यांची प्रशासनाला सूचना ; उरुसाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यासमवेत पाहणी निपाणी (वार्ता) : बोरगाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बाबाढंगवली व हजरत पीर हैदरशा मदरशा यांचा उरुसाला शुक्रवारपासून (ता.७ नोव्हेंबर) प्रारंभ होणार आहे. या काळात पवित्रता, शांतता, स्वच्छता, आरोग्यं व मूलभूत सुविधांकडे प्राधान्य द्यावे. …

Read More »

मलप्रभा नदीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धेला नागरिकांनी वाचवले

  खानापूर : खानापूर येथील मलप्रभा नदीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्ध महिलेला नागरिकांनी वेळीच रोखले आणि त्यांना खानापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. या वृद्ध महिलेला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती सांगता येत नाहीये किंवा त्या आपले नावही सांगत नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख पटत नाहीये. त्यांची ओळख पटल्यास नागरिकांनी तात्काळ …

Read More »

मतदारसंघासह महिलांच्या विकासासाठी प्रयत्नशील

  सुप्रिया पाटील; माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य महिला काँग्रेस सेक्रेटरी पदी निवड झाल्यामुळे आपल्या राजकीय जीवनाच्या वाटचालीला प्रारंभ झाला आहे. त्या माध्यमातून निपाणी मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. नेते मंडळींनी विश्वास ठेवून दिलेल्या पदाशी प्रामाणिकपणे राहून त्यांच्या निर्णयानुसार कार्यरत राहणार असल्याचे, मत सुप्रिया दत्त कुमार …

Read More »