खानापूर : शेजारच्या गोवा आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरीयंटचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खानापूर तालुक्यातील चोर्ला राज्यमार्गावरील कणकुंबीत चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे. चोलामार्गे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अथवा कोरोना लसीकरण झाल्याचा दाखला दाखविणाऱ्यांनाच प्रवेश दिला …
Read More »शाळा खोल्या दुरूस्तीसाठी चापगाव ग्रा. पं.चे निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील चापगांव मराठी प्राथमिक शाळेच्या तीन खोल्या आणि कन्नड प्राथमिक शाळेची खोली अशा चार खोल्या कोसळण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा शिक्षण खात्याच्यावतीने चारही खोल्या लवकरात लवकर दुरूस्त करून विद्यार्थी वर्गाची सोय करावी. अशा मागणीचे निवेदन शिक्षण खात्याच्या बीईओ कार्यालयाला देण्यात आले. यावेळी बीईओ कार्यालयाचे मॅनेजर प्रकाश होसमनी …
Read More »जामगावात नेटवर्क अभावी ऑनलाईन अभ्यास कसा होणार?
खानापूर (सुहास पाटील यांजकडून) : खानापूर तालुक्यातील अतिमागासलेल्या आणि दुर्गम अशा जंगल भागातील शिरोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जामगाव (ता. खानापूर) भागात नेटवर्क नसल्याने शिक्षकांनी दिलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा बट्टयाबोळ झाला आहे.सध्या कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईनचे धडे घ्यावे लागत आहेत. परिस्थितीने गरीब असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना पालकाकडुन महागडे मोबाईल देऊन जामगावसारख्या भागात नेटवर्क नाही. …
Read More »अन्न व औषध प्रशासनातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण
खाद्यपदार्थ विक्री व्यवसायिकांना प्रशिक्षण बंधनकारक : व्यवसायिकांना मिळणार प्रमाणपत्र निपाणी : केंद्र शासनाच्या एफएसएसएआय व फॉस्टॅक योजनेतून खाद्यपदार्थ आणि फळ विक्री व्यवसायिकांना अन्न व औषध प्रशासनातर्फे बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवसायिकांना हे प्रशिक्षण बंधनकारक असून त्यानंतर सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. …
Read More »म्युनिसिपल शाळेसाठी रस्त्यावर उतरणार!
डोंगरी भागातील माजी विद्यार्थ्यांचा निर्धार : ग्रामीण भागात बैठका निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी शहरासह ग्रामीण आणि डोंगरी भागाच्या सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या मुलांच्यासाठी कामधेनू ठरलेल्या निपाणी येथील मुन्सिपल हायस्कूल सरकारकडे हस्तांतरण करण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. त्यामुळे भविष्यकाळात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आणि पालकांची हेळसांड होणार आहे. त्यामुळे हस्तांतराचा …
Read More »खानापूरात पावसाची संततधार सुरूच
खानापूर (प्रतिनिधी) : आज चौथ्या दिवशीही खानापूर शहरासह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या, नाल्याच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे.तालुक्यातील खेडेगावात भात रोप लागवडीचे काम अजुन बऱ्याच ठिकाणी व्हायचे आहे. त्यामुळे भात रोप लागवडीला जोर आला आहे. यंदा पावसाने योग्य साथ दिली नाही. त्यामुळे रोप लागवडीचे काम रेंगाळले …
Read More »आरोग्य अधिकारी डॉ. नांद्रेचा नगरपंचायतीच्यावतीने सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात नगरपंचायतीच्यावतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.गेल्या दोन वर्षापासुन देशभरात कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला. अनेकाचे संसार उघड्यावर पडले, कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. त्याच बरोबर अनेकांना नोकरी गमवावी लागली. कित्येकाचे रोजगार गेले. अशावेळी कोरोनाच्या विरूद्ध लढण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण सुरू …
Read More »खानापूर तालुक्यातून दहावी परीक्षेला २३ केंद्रात ४२१४ विद्यार्थी बसणार
खानापूर (प्रतिनिधी) : सन २०२१-२२मधील दहावीची परीक्षा जुलैच्या १९ व २२ रोजी होणार आहे.सदर दहावी परीक्षेला तालुक्यातून जवळपास ४२१४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी तालुक्यात दहावी परीक्षेसाठी २३ परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तर ३७१ परीक्षा खोल्यांचे आयोजन करण्यात आले.या दहावीच्या परीक्षेत १९०० मुले, १७८५ मुली, असुन बहिस्थ विद्यार्थ्यामधून …
Read More »मारूती नगरातील नागरी समस्या सोडवा; नगरपंचायतीला निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विविध भागात समस्यांचा डोंगर आहे. विद्यानगरात रस्ता, गटारी, डुक्कराची वर्दळ अशी समस्या असतानाच आता मारूतीनगरातील रस्ता, गटारी व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवा या मागणीसाठी भाजपचे नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी व स्थायी कमिटी अध्यक्ष मादार व मुख्याधिकारी विवेक बन्ने यांना निवेदन …
Read More »खानापूर युवा समिती पाठवणार पंतप्रधानांना अकरा हजार पत्रे!
खानापूर : सीमाप्रश्नाच्या संदर्भातील प्रत्येक लढ्यात जांबोटी भागातील कार्यकर्ते नेहमीच अग्रभागी होते. म्हणूनच या भागाला महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मात्र अलीकडे चळवळीला मरगळ आली असताना युवा समितीने नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. इथले युवक युवा समितीच्या प्रत्येक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे आश्वासन जांबोटी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta