Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

कोगनोळी दुधगंगा नदीत मगरीचा वावर

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या दूधगंगा जुन्या पुलानजीक मगरीचा वावर वाढला असून शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोगनोळी परिसरात मगरीचे वारंवार दर्शन होत असल्याने रात्री-अपरात्री विद्युत मोटर सुरू करण्यासाठी जाणार्‍या शेतकर्‍यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसा पाठीमागे कोगनोळी नजीकच मगरीचे …

Read More »

हलशीवाडी येथे 5 डिसेंबरपासून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : हलशीवाडी (ता. खानापूर) येथील युवा स्पोर्ट्सच्या वतीने 5 डिसेंबरपासून ग्रामीण भाग मर्यादित भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. नरसेवाडी गायरान हलशी येथील मैदानावर स्पर्धा पार पडणार असून स्पर्धेतील विजेत्या संघाला सागर पाटील यांच्या स्मरणार्थ साहेब फौंडेशन बेळगावतर्फे 41 हजार रूपये व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला …

Read More »

नंदगड येथील तरुण मंडळाच्या कबड्डी क्रीडा महोत्सवास प्रारंभ

खानापूर : 61 वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या नंदगड येथील तरुण मंडळाच्या कबड्डी क्रीडा महोत्सवास शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दोन दिवस हा महोत्सव चालणारआहे.स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पंच पी. के. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रेश्मा तालिकोटी, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय …

Read More »

हलशीसह विविध गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे युवा समितीच्या कार्यकर्त्यांकडून हेस्कॉम अधिकारी धारेवर!

बेळगाव : ऐन दिवाळीमध्ये हलशी भागातील विविध गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बीडी येथील हेस्कॉमच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला तसेच यापुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.गेल्या काही महिन्यांपासून हलशी, नंदगड, हलगा, मेरडा आदी भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास …

Read More »

राज्यात पेट्रोल आणि डिझेल दरात 7 रुपये कपात : मुख्यमंत्री बोम्माई

बेंगळुरू : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरात कपात केली असून आज रात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे. शहरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सदर माहिती दिली आहे. केंद्र सरकारने बुधवारी रात्री पेट्रोल दरात ५ आणि डिझेल दरात १० …

Read More »

लोंढा आरएफओ गौराणीच्या गुंडगिरीचा भाजपकडून निषेध

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता. खानापूर) चे आरएफओ प्रशांत गौराणी यांनी माजी जि. पं. सदस्य व भाजप नेते बाबूराव देसाई यांना रविवारी लोंढा वनविभागाच्या कार्यालयात बोलावून शिवीगाळ करत कपाळाला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सोमवारी बोलविलेल्या पत्रकार परिषेद बाबूराव देसाई यांनी सांगितले.ते बोलताना म्हणाले की, माचाळी गावची समस्या सोडविण्यासाठी …

Read More »

तालुक्यात शिक्षक भरती करून शिक्षकांची समस्या सोडवा

आम आदमी पक्षाच्यावतीने निवेदन सादर खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळातून जवळपास 300 हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यातील काही प्राथमिक मराठी शाळेत एकच कन्नड शिक्षक आहेत. काही शाळेत अतिथी शिक्षक आहेत. त्यामुळे मराठी शाळेचा शैक्षणिक दर्जा खालवला …

Read More »

महामार्गा शेजारील 300 कुटुंबियांना वाचवा

नागरिकांची मागणी : नगराध्यक्ष भाटले यांना निवेदन निपाणी : भविष्यात होणार्‍या आणि शहरातून जाणार्‍या महामार्ग क्र. 4 च्या रुंदीकरणाबाबत शिवाजी नगर परिसरातील नागरिकांनी निवेदन देवून येथील रहिवाश्यांचा गांभिर्याने विचार करून त्यांची कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवावे, अशी मागणी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनातील माहिती अशी, शिवाजी नगर भागातून …

Read More »

दीपावली, राज्योत्सवासाठी मार्गसूची जारी

दीपावलीत हरित फटाक्यानाच परवानगी, राज्योत्सवात 500 लोकांची मर्यादा बंगळूरू : राज्य सरकारने दीपावली सण आणि राज्योत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिवाळी साध्या आणि काटकसरीने साजरी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कोविडच्या खबरदारीच्या उपायांचे पालन करून दिवाळी सण फक्त हिरव्या फटाक्यांसह साजरा करावा असे सरकारने आवाहन केले आहे. दरम्यान, …

Read More »

खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाला कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील विविध राजकीय पक्ष संघटना, संस्था सामाजिक संघटना, यांच्यासह कोल्हापूरकरांचा शनिवारी झालेल्या धरणे सत्याग्रह आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळाला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या ‘आम्हाला आता महाराष्ट्रात यायचंच‘ या ठाम निर्धाराच्या उद्देशाने आरपार की लढाईचे रणशिंग फुंकले होते. शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 4 …

Read More »