संकेश्वर (वार्ता) : कोरोनाचे काटेकोरपणे पालन फक्त हिंन्दूंनीच करावयाचे काय? कोरोनाचा एकाला एक तर दुसर्याला दुसरा नियम असल्याचे श्रीरामसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोदजी मुतालिक यांनी आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले, सरकार कोरोना नियमात देखील दुजाभाव करीत आहे. कोरोनाचे सर्व नियम हिंदूंना लागू केले जात आहेत. त्यामुळे हिन्दूंचे सर्व देवस्थान बंद ठेवण्याचा आदेश धाडला जात आहे. यात्रोत्सवावर बंदी आणून यात्रेवर अवलंबित लोकांच्या पोटावर पाय आणण्याचे काम सरकार पद्धतशीरपणे करीत आहे. निवडणूका आल्या कि कोरोना गायब होतो. हिंन्दूंचे धार्मिक कार्यक्रमांत मात्र कोरोनाचा शिरकाव होतो. सरकार कोरोनाच्या नावाखाली गोरगरिब लोकांची थट्टा करीत आहे. नाईट कर्फ्युमुळे आणि विकेंड लॉकडाऊनमुळे कोरोना जाणार आहे काय? यांचे स्पष्टीकरण सरकारने जनतेला द्यावे. कोरोना शनिवार रविवार फिरकत नाही काय? रात्री तो गायब होतो काय? याचे उत्तर जर सरकारकडे नसेल तर हे नाटक बंद करावे. मुस्लिम लोक लॉऊडस्पिकरवर आजान देऊन सामुहिक नमाज पठन करतात, ख्रिश्चन लोक चर्चेमध्ये सामुहिक प्रार्थना करतात. त्याला सरकार मज्जाव करीत नाही. याचा अर्थ सरकारचे धोरण हिन्दु विरोधी असल्याचे स्पष्ट होते. कोरोना आहे तर सगळ्यांना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करायला भाग पाडा. एकाला एक तर दुसर्याला दुसरा कोरोना नियम लागू करुन हिंन्दुंना डिवचाल तर याद राखा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीरामसेना हुक्केरी तालुका अध्यक्ष सुभाष कासारकर, शिवराज नाईक, विवेक पुराणिक, नेताजी आगम, विनायक भोसले, विकास ढंगे, मराठा समाज अभिवृद्धी संघाचे अध्यक्ष अप्पा मोरे, पुष्पराज माने कार्यकर्ते उपस्थित होते.
