Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

अभिमानास्पद! भारताचा ‘चंद्रस्पर्श’… चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

  श्रीहरिकोटा : भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची बातमी… इस्रोच्या चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे. ऊर आनंदाने भरून आला आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय… गर्व आहे मला, मी भारतीय …

Read More »

चांद्रयान-3 लॅंडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज, वातावरण पोषक असल्याची इस्रोची माहिती

  श्रीहरिकोटा : भारताचे चांद्रयान लँडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं असून त्यासाठी वातावरण पोषक असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. चांद्रयान आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणार असून अशी कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश असणार आहे. भारताचं महत्वाकांक्षी चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालंय. चांद्रयान-3 लॅण्ड …

Read More »

मिझोराममध्ये काम सुरू असलेले रेल्वे पूल कोसळून 17 मजूर ठार

  मिझोराममध्ये बुधवारी एक बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून किमान 17 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. वृत्तसंस्था पीटीआयने अधिकार्‍यांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे. मिझोरमची राजधानी आयजोल पासून 21 किमी अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये सकाळी 10 वाजता हा अपघात झाला. घटनेच्या वेळी पुलावर 35 ते 40 मजूर काम करत होते. …

Read More »

भारताचे चंद्रावर आज पहिले पाऊल!

  श्रीहरिकोटा : संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-३ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली चांद्रयान-३ मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहेत. चांद्रयान-३च्या सॉफ्ट लॅण्डिंगचं काऊंटडाऊन काल …

Read More »

शेतकऱ्यांना लागणार लॉटरी! पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता वाढणार

  नवी दिल्ली : देशात पुढील वर्षात लोकसभेसह काही राज्यांमध्ये निवडणुका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र सरकार मोठी भेट देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांच्या सध्याच्या हप्त्यात वाढ होऊ शकते. फायनेन्शिअल एक्सप्रेसने याविषयीचे वृत्त दिले. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेने शेतकऱ्यांना …

Read More »

चांद्रयान 3 चं काऊंटडाऊन सुरु, 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न

  श्रीहरिकोटा : संपूर्ण भारताचं लक्ष लागलंय ते भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेकडे. कारण आता लँडिंगचं काऊंटडाऊन सुरू झालाय आणि उद्या म्हणजे 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार आहे. भारतासाठी हा क्षण गौरवाचा आणि अभिमानाचा असेल. सध्या चांद्रयान-3 चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटवर असून लँडिंगची तयारी सुरू आहे. दरम्यान, …

Read More »

व्याघ्र कॉरिडोरमुळे कळसा-भांडुरा प्रकल्पाला अडथळे : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

  पणजी : म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासंदर्भात भाजपने कोणतेही राजकारण केलेले नाही. याबाबतच्या सविस्तर प्रकल्प अहवालासही (डीपीआर) केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. कोणत्याही स्थितीत ही योजना मार्गी लागेल. पण नियोजित व्याघ्र कॉरिडोरमुळे प्रकल्पाला अडथळे येत असल्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले. कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, …

Read More »

चांद्रयान-3 चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर; लँडिंगचा शेवटचा टप्पा पार

  श्रीहरिकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-3 ही अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 उतरण्यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, विक्रम लँडर आता त्याची उंची आणि वेग कमी करत आहे. चांद्रयान-3 ने रात्री उशिरा म्हणजेच रविवारी (20 ऑगस्ट) पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान आणखी एक महत्त्वाचा …

Read More »

लडाखमध्ये भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळून ९ जवान शहीद

  नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये शनिवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. राजधानी लेहजवळील क्यारी गावातून जाणारं लष्कराचं एक वाहन दरीत कोसळलं आहे. या भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांचा मृत्यू झाल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नऊ जवान शहीद झाल्याची लष्कराने …

Read More »

इस्रोच्या चंद्रमोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा!

  विक्रम लँडर प्रोप्लशन मॉडेलपासून वेगळा; चांद्रयान-3 लवकरच चंद्रांवर उतरणार   श्रीहरीकोटा : भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील आणखी एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या चांद्रयान-3 चं विक्रम लँडर प्रोप्युलुशन मॉडेलपासून वेगळं झालं आहे. आता इस्रोने ट्वीट करत चांद्रयान-3 संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. चांद्रयान-3 …

Read More »