Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. खताच्या किमतीत सरकार वाढ करणार नाही, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. खरीप हंगामासाठी १.८ लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. युरियासाठी सरकार ७० हजार कोटी रुपये आणि डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी ३८ हजार कोटी रुपये खर्च …

Read More »

‘एनआयए’चे वेगवेगळ्या गुन्ह्यांसदर्भात ६ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे

  नवी दिल्ली : एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) चे बुधवारी हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे टाकले. एनआयए ने गेल्या वर्षी दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांच्या संदर्भात छापे टाकले जात आहेत. यामध्ये दहशतवादी अमली पदार्थ तस्करी आणि संबंधित गुंडांसोबतच्या संगनमत …

Read More »

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी डीके शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली : कर्नाटक कााँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष डीके शिवकुमार यांच्याविरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरण चौकशीला कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सीबीआयच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयानेही स्थगिती दिली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेवरील पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १४ जुलैपर्यंत तहकुब केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे …

Read More »

उ. प्रदेशमध्‍ये भीषण अपघात : टँकरची रिक्षाला धडक, एकाच कुटुंबातील ९ जण ठार

  फतेहपूर : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात आज (दि.१६) भीषण अपघात झाला. दुधाच्या टँकरने ऑटोला धडक दिली. या दुर्घटनेत एकच कुटुंबातील ९ जणांचा मृत्‍यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. कानपूर देहाटमधील मूसानगर येथील रिक्षाचालक आपल्‍या कुटुंबासह मूसानगर येथून जहानाबाद …

Read More »

नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; दिल्ली निवासस्थानी अज्ञाताचा फोन

  नवी दिल्ली : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे सत्र सुरूच आहे. तिसऱ्यांदा धमकी मिळाल्याने त्यांच्या सुरक्षेसंबंधीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास अज्ञाताने गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करीत धमकी दिल्याचे कळतेय. त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे. …

Read More »

पाक लष्कर इम्रान खानवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

  कराची : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे रोजी भ्रष्टाचार प्रकरणी अटक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. तर दुसरीकडे, पाक लष्कराने इम्रान खान …

Read More »

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर ममता बॅनर्जींचा सूर बदलला; काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत केले मोठे भाष्य

  कोलकाता : काँग्रेस पक्षासोबत २०१९ नंतर सतत पंगा घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सूर कर्नाटकच्या निकालानंतर काही प्रमाणात बदलला आहे. सोमवारी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी तयार आहोत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवस …

Read More »

सैन्य अ‍ॅक्शन मोडमध्ये; अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू

  जम्मू : जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यातील अंडवान सागरम भागात आज (दि.१४) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. याबाबत पोलिसांनी रविवारी (दि.१४) सकाळी ट्विट करत सांगितले. सध्या दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवादी सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने घुसून लष्कराच्या जवानांवर हल्ले करत आहेत. …

Read More »

शिंदे सरकारला ‘सर्वोच्‍च’ दिलासा : ‘अपात्रते’चा निर्णय आता विधानसभा अध्‍यक्षांच्‍या ‘कोर्टात’

नवी दिल्ली : देशासह महाराष्‍ट्राचे लक्ष लागून राहिलेल्‍या महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (दि.११) सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला. घटनापीठाने एकनाथ शिंदेसह १६ आमदारांच्‍या अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्‍यक्ष घेतील, असे स्‍पष्‍ट केले. या निर्णयामुळे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच गेल्‍या १० महिन्‍यांहून अधिक काळ सुरु …

Read More »

बस नदीत कोसळून 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू

  खरगोन – मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरगोन जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. बस नदीत कोसळल्याने अपघातात 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी असल्याची आहेत. सद्यस्थितीत जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे. खरगोन ठिकरी महामार्गावर हा अपघात झाला आहे. …

Read More »