Sunday , July 26 2026
Breaking News

कोनेवाडी फाट्यावर कारने दोघांना उडवले; प्राध्यापकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

Spread the love

 

तेऊरवाडी (एस के पाटील) : पर्यटनासाठी जाणाऱ्या चारचाकी कारने बेळगाव – वेंगुर्ला मार्गावर कोनेवाडी (ता. चंदगड ) फाट्यानजीक दोन दुचाकीना उडवले यामध्ये चंदगड येथील श्री रवळनाथ ज्यूनिअर कॉलेज चंदगड येथे अध्यापन करणारे प्रा. सतिश सिताराम शिंदे (वय ३५) मुळ गाव कोनेवाडी ता. चंदगड सध्या राहणार यशवंत नगर यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक या अपघातात गंभीर जखमी झाला आहे .
चंदगड पोलिसातून मिळालेल्या माहिती नुसार हिरो होंडा ड्रिम युगा मोटर सायकल (नं. MH 09 D Q 2434) वरून चंदगड येथील कॉलेजकडे सिताराम शिंदे हे सकाळी ७.३० वाजता जात होते .
त्याचवेळी हुंडाई ओरा कंपनीची चारचाकी (नं. MH 14 KQ 8220) पर्यटनासाठी जात होती. यावेळी या चारचाकीचे चालक स्वप्नील सुनिल चांदन (वय २३ वर्ष) रा. संत ज्ञानेश्वर नगर थेरगाव जि. पूणे याचा अतिवेगाने वाहनावरील ताबा सुटल्याने चूकीच्या बाजूने जाऊन होंडा ड्रिम युगा मोटर सायकल व हिरो होंडा स्पेलंडर मोटर सायकल (नं. MH 09 FE 2949) या दोन दूचाकीना समोरून ठोकरले. याच कारने आणखी एका दुचाकीस्वाराला ठोकरल्या ची चर्चा घटना स्थळी चालू होती. यामध्ये प्रा. सतिश शिंदे यांच्या डोकीस तसेच छातीस मार लागून त्यांचा जागीच मृत्यु झाला तर पारस सुरेश निर्मळकर यांचे डोकीस तसेच डावे हात फ्रेंक्चर झाल्याने गंभीर जखमी झाले. यासंदर्भात चंदगड पोलिसात संजय अर्जुन शिंदे रा. कोनेवाडी यानी फिर्याद दिली असून आरोपी विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
या घटनेचा अधिक तपास चालू आहे.

प्रा. सतिश शिंदे यांच्यावर यशवंत नगर येथे अंत्यसंस्कार

अत्यंत साधी राहणी, मनमिळावू अन विद्यार्थी प्रिय असणारे प्रा. सतिश इंग्रजी विषयाचे अध्यापन करत होते. त्यांच्या आकस्मित मृत्यूने सर्व विद्यार्थी व शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला. दुपारी यशवंत नगर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी व ४ वर्षांची एक मुलगी असा परिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिनोळीत पाद्यपूजन सोहळा उत्साहात साजरा

Spread the love  चंदगड (प्रतिनिधी) : शिनोळी बुद्रुक येथे विद्या चेतना प्रकल्पांतर्गत शिनोळी बु. येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *