Sunday , September 20 2026
Breaking News

श्रीक्षेत्र वैजनाथ देवरवाडी येथे 8 मार्च रोजी महाशिवरात्री

Spread the love

 

शिनोळी : देवरवाडी येथील श्रीक्षेत्र वैजनाथ देवालय हे प्राचीन, पुरातन काळातील मंदिर असून यादव काळात हेमाडपंथीय कलाकुसरीत साकारलेले देवस्थान आहे. बेळगाव सीमाभागातील तसेच महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवालयात लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात.

पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला म्हणजेच 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री असून 7 मार्च रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत भाविक भक्तांचे अभिषेक केले जातात. 8 मार्च रोजी महाशिवरात्री भर यात्रा असून या रात्री महारुद्र अभिषेक, यामपूजा केली जाते. तर 9 मार्च रोजी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते व त्यानंतर महाशिवरात्री उत्सवाची सांगता होते. ज्या भाविक भक्तांना अभिषेकसाठी नाव नोंदणी करावयाची आहे त्यांनी 7 मार्च पर्यंत आपली नावे श्री वैजनाथ देवालय स्थानिक सल्लागार उपसमितीकडे नोंदवावीत तसेच लाखो भाविकांनी दर्शनासाठी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन वैजनाथ देवालय स्थानिक सल्लागार उपसमितीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; हुक्केरी तालुक्यातील तिघांना अटक

Spread the love  चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *