Friday , November 6 2026
Breaking News

‘शिवसेना आणि मी तुमच्यासोबत’; राऊतांच्या कुटुंबियांना उद्धव ठाकरेंकडून धीर

Spread the love

 

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काल संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्यांची ईडी कार्यालयात नेऊन चौकशी देखील करण्यात आली होती. अखेर रात्री उशीरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आता उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या परिवाराला धीर देण्यासाठी भांडूप येथील घरी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आईंनी भेट घेतली. ”संकटाच्या काळात मी तुमच्या सोबत आहे”, असा शब्द त्यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांना दिला.

रविवारी संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आईंना अश्रू अनावर झाले होते. तसेच त्याच्या परिवारातील इतर सदस्यदेखील भावूक झाल्याचे बघायला मिळाले. संकटाच्या काळात शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे, हे दाखवण्याचा उद्ध ठाकरेंचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांच्या आईंना धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे राऊत यांच्या निवास्थानी पोहोचले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन

Spread the love    लावणीसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *