नागपूर : जयंत पाटील यांचं निलंबन, कर्नाटक सीमावाद आणि दिशा सालियन प्रकरणावरून यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापलंय. विरोधक आज सभागृहात न जाता विधिमंडळाबाहेर आंदोलन करणार आहेत. विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत, असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे. त्याचसोबत विरोधकांकडून पायऱ्यांवर प्रतिसभागृह करण्यात आले आहे.
विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले, सभागृहात काल जे घडल ते चुकीचं आहे. त्यामुळे काल आम्ही यामुळे बाहेर पडलो होतो. आजही आमची तीच भूमीका असणार आहे. त्यांचं नीलंबन मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे. मात्र ती मान्य होतं नाही त्यांचं निलंबन मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे मात्र ती मान्य होतं नाही. जयंत पाटील यांना अडकविण्यासाठी ते अध्यक्षांना म्हणाले असं चित्र रंगवलं गेले हे अन्यायकरक आहे. अनेकदा सभागृहात shame shame म्हणतो याचा अर्थ मराठी मध्ये काय आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
विरोधी पक्षाकडून करण्यात आलेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अनिल पाटील, जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, अदिती तटकरे, सुनील शेळके, ऋतुजा लटके सहभागी झाले आहेत.