Sunday , September 20 2026
Breaking News

आता पेट्रोल-डिझेल महागले

Spread the love

 

नवी दिल्ली : मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास एक हजार रूपयांची वाढ झाली होती. तर दोन दिवसांपूर्वीच सीएनजीचे दरही वाढवण्यात आले होते. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिकसह देशभरात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

मुंबईत पेट्रोलच्या दरात ३.१४ रुपयांची वाढ होऊन 106.68 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची वाढ होऊन 93.14 रुपये प्रति लिटर झाले आहे. नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 3 रुपयांची वाढ झाली आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचे दर 107.93 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 94.41 रुपये प्रति लिटर इतके झाले आहे. पुणे, परभणी, ठाणे, सोलापूर, संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर नागपूरमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलचा दर आता 94.77 रुपयांवरून 97.77 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलचे दर 87.67 रुपयांवरून 90.67 रुपये प्रति लिटर झाले आहेत. या दरवाढीमुळे अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या वर गेले आहेत. कोलकातामध्ये 3.29 रुपयांच्या दरवाढीनंतर पेट्रोल आता 108.74 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 3.11 रुपयांनी वाढून 95.13 रुपये प्रति लिटर झाले आहे. चेन्नईमध्येही मोठी दरवाढ झाली असून पेट्रोलचे दर 2.83 रुपयांनी वाढून 103.67 रुपये प्रति लिटर झाले आहेत आणि डिझेलचे दर 2.86 रुपयांनी वाढून 95.25 रुपये प्रति लिटर झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *