पंकज पाटील : कोगनोळी येथे निषेध
कोगनोळी : श्रीक्षेत्र सम्मेद शिखरजी जैन धर्मियांचे पवित्र स्थान आहे. या पवित्र क्षेत्राला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषणा केली आहे. पर्यटन स्थळ नसून पवित्र स्थान आहे. झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषणा केलेली ताबडतोब रद्द करावी अशी मागणी करत कोगनोळी व परिसरातील समस्त जैन समाज यांच्यावतीने निषेध व्यक्त केला.
कोगनोळी तालुका निपाणी येथे श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
कुमार पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कोगनोळी येथील समस्त जैन समाजाच्या वतीने पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केल्याबद्दल झारखंड सरकारचा निषेध व्यक्त करून समस्त जैन धर्मियांच्या वतीने निपाणी येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
दुपारी बारा वाजता निपाणी येथील तहसीलदार प्रवीण कारंडे यांना समस्त जैन समाज वतीने निवेदन दिले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य राजगोंडा पाटील, महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश शेटे, एल डी चौगुले, वीरेंद्र चौगुले, धीरज मगदूम, सुभाष पाटील, उदय मोनाप, मांगुर जैन समाज अध्यक्ष बाबासाहेब पाटील, पिंटू पाटील, बाहुबली पाटील, बबन पाटील, मल्लाप्पा चौगुले, रमेश पाटील, अंकित उपाध्ये, राजगोंडा पाटील, सुनील पाटील, राजगोंडा चौगुले, अभिजीत माणगावे, बबन चौगुले, बाळासाहेब पाटील, अभी पाटील, सुरज पाटील, केतन चौगुले यांच्यासह अन्य मान्यवर, महावीर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, जैन युवा मंचचे पदाधिकारी, वीर सेवा दलचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.