Sunday , September 20 2026
Breaking News

आप्पाचीवाडी पुलाच्या कामासाठी २८ रोजी पाटबंधारे खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकणार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, मतिवडे, सुळगाव आणि हदनाळ या गावांना जोडणाऱ्या कॅनॉलवरील पुलाचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा २० मे रोजी पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला होता. पण काही तांत्रिक अडचणीमुळे मोर्चावर टाळे ठोकण्याचा कार्यक्रम २८ रोजी होणार असल्याची माहिती रविवारी (ता.७) आयोजित रयत संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेली जात आहे. यामुळे ११ मार्च रोजी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र दोन महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे निपाणी हुक्केरी आणि संकेश्वर येथील शेतकऱ्यांचा २० मे रोजी मोठ्या प्रमाणात मोर्चा पूर्वनियोजित करण्यात आलेला आहे. त्याची तारीख तीन महिन्यांपूर्वीच निश्चित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य रयत अंकसंघटनेने आपला मोर्चा २० मे ऐवजी २८ मे रोजी घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“प्रशासनाने तत्पूर्वी या कॅनॉलवरील पुलाच्या कामाचा शुभारंभ करावा. अन्यथा २८ मे रोजी पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल. असे सागितलेयावेळी ॲड. सूर्याजी पोटले, किसन पोटले, सचिन पटेकर, आशिष करे, संजय माने यांच्यासह कर्नाटक राज्य रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *