Sunday , September 20 2026
Breaking News

नागरीकांमध्ये बंधुभाव निर्माण करण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी

Spread the love

 

ए. जी. कांबळे; मानव बंधुत्व वेदीकेची तालुकास्तरीय बैठक

निपाणी (वार्ता) : आदर्श कार्यकर्ता हा शिस्तप्रिय,अभ्यासू, समाजाभिमुख, संवेदनशील आणि निस्वार्थी असला पाहिजे. समाजातील समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करणे आणि नागरीकांमध्ये बंधुभाव निर्माण करणे ही कार्यकर्त्यांची प्रमुख जबाबदारी असल्याचे मत प्रशिक्षक ए. जी. कांबळे यांनी यांनी व्यक्त केले. येथील शासकीय विश्रामधामात आयोजित मानव बंधुत्व वेदिकेच्या तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष जीवन मांजरेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून चिकोडी जिल्हाध्यक्ष विठ्ठल मादर उपस्थित होते.
समाजप्रबोधन, महापुरुषांच्या विचारांचा प्रसार आणि संघटन बांधणी या विषयांवर मार्गदर्शन करत विविध सामाजिक उपक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महेश धम्मरक्षित यांनी स्वागत केले.

प्रा. अनिल मसाळे यांनी भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी, मानवतावादी व परिवर्तनवादी विचारधारेचा आढावा घेतला. समाजात बंधुता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी या महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. समाज परिवर्तनासाठी विचारांची पेरणी सातत्याने करण्याचे आवाहन त्यांनी केले.
चिकोडी जिल्हाध्यक्ष विठ्ठल मादर यांनी, मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. शिक्षण, सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. विभागीय अध्यक्ष जीवन मांजरेकर यांनी मानव बंधुत्व वेदिकेच्या स्थापनेमागील उद्दिष्टे, संघटनेची वाटचाल आणि सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी विषयी माहिती दिली. समाजात बंधुता, समता आणि मानवतावादी मूल्ये रुजविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीनंतर विभागीय अध्यक्ष जीवन मांजरेकर व जिल्हाध्यक्ष विठ्ठल मादर यांच्या हस्ते महेश धम्मरक्षित यांची मानव बंधुत्व वेदिका, निपाणी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
कार्यक्रमास मानव बंधुत्व वेदिकेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दीपक शेवाळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *