
पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचे आवाहन
निपाणी (वार्ता) : वाढनिमित्त केक, हारतुरे आणि शुभेच्छांचा वर्षाव सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संचालक शिप्पुर येथील आनंद केसरकर यांनी या रूढ चौकटीला छेद देत आपला वाढदिवस चक्क रोपांच्या माध्यमातून साजरा केला. वाढदिवसाचा प्रत्येक आनंद निसर्गाला समर्पित करण्याचा हा उपक्रम सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात आदर्श ठरला आहे.
भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांच्या पुढाकारातून झालेल्या कार्यक्रमात डॉ. राजेंद्र लवटे यांच्या हस्ते आनंद केसरकर यांचा गुलाबाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
नामदेव चौगुले यांनी, वाढदिवसाला खर्च होणारा पैसा आणि वेळ जर निसर्गासाठी दिला, तर एका दिवसाचा आनंद वर्षानुवर्षे हिरवाई देऊ शकतो.वाढदिवसाच्या शुभेच्छा फुलांपुरत्या मर्यादित नकोत; त्या फुलणाऱ्या रोपांमध्ये दिसल्या पाहिजेत. केक कापून एक दिवस आनंद मिळतो. पण एक रोप लावून अनेक पिढ्यांना जीवन देणे शक्य असल्याचे सांगितले.
वा’ढदिवस एक रोप एक संकल्प’ या भावनेतून झालेल्या या उपक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमास अविनाश सुतार, शामरा केसरकर, अमर पोवार, संभाजी केसरकर, अजित पोवार, गणपती सुतार, कृष्णात केसरकर, रणजीत पाटील, आण्णाप्पा खराडे, रमेश हावळे, संतष पाटील, सर्जेराव आरडे, सचिन पोवार, संभाजी पाटील, नितीन रणदिवे, अशोक माने, बाळकृष्ण पाटील शामराव मारुती कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta